|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » संदेश पारकर यांची उमेदवारी उद्या

संदेश पारकर यांची उमेदवारी उद्या 

भाजपमधून उमेदवारीची खात्री! : मिरवणुकीने अर्ज दाखल करणार

प्रतिनिधी / कणकवली:

कणकवली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आपण उतरणार आहे. भाजपकडून आपणाला उमेदवारी मिळणार, याची खात्री असून 3 ऑक्टोबरच्या मुहुर्तावर आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यासाठी सकाळी 10 वा. मुख्य चौकातून कार्यकर्त्यांसह मिरवणुकीने जाऊन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजप नेते संदेश पारकर यांनी दिली.

कणकवली विधानसभा मतदारसंघातून अद्याप भाजपने कुणालाही उमेदवारी जाहीर केलेली नाही. याठिकाणी स्वाभिमान पक्षाचे भाजपात विलीनीकरण करून आमदार नीतेश राणेंना तिकीट दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपकडून संदेश पारकर, अतुल रावराणे हे इच्छूक आहेत. आता स्वाभिमानला सोडचिठ्ठी दिलेले सतीश सावंतही चर्चेत आहेत. या साऱयाच्या पार्श्वभूमीवर पारकर यांच्यावतीने उमेदवारी अर्ज सोमवारी नेण्यात आले आहेत.

Related posts: