|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शांतादुर्गा कुंकळळीकरीणचा मखरोत्सव उद्यापासून

शांतादुर्गा कुंकळळीकरीणचा मखरोत्सव उद्यापासून 

प्रतिनिधी/ कुंकळ्ळी

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानचा वार्षिक मखरोत्सव गुरुवार 3 पासून सुरू होऊन 7 पर्यंत चालणार आहे. यानिमित्त रोज रात्री 9 वा. मंगलवाद्यांच्या तालावर सजविलेल्या भव्य मखरात देवीला विराजमान करण्यात येते. त्यानंतर मंदिरातील नेहमीच्या आरत्या होतील व पुराण वाचनानंतर मंगलवाद्यांच्या तालावर महाआरत्या ओवाळत मखर झुलविण्याचा नेत्रदीपक असा सोहळा होईल.

अनेक भाविक या क्षणाचा आनंद लुटण्यासाठी हजर राहत असतात. गोवाभरातून भाविक या उत्सवाला हजेरी लावत असतात. दरम्यान, संस्थानच्या नवरात्रोत्सवाला 29 पासून घटस्थापनेने प्रारंभ झाला असून सकाळी विविध धार्मिक विधी, आरत्या असे कार्यक्रम 7 पर्यंत चालतील. मंगळवार 8 रोजी विजयादशमी साजरी करण्यात येणार आहे.

दसरोत्सवानिमित्त सकाळी धार्मिक विधी होतील व सायंकाळी 4 वा. पारंपरिक जागी सीमोल्लंघनासाठी वाद्यांसह श्रींचे मिरवणुकीने प्रस्थान होणार आहे. त्या ठिकाणी पिंपळापेडावर पालखी ठेवण्यात येईल व आरत्या, तीर्थप्रसाद झाल्यानंतर भाविकांकडून सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. यावेळी देवीला सर्वप्रथम आपटय़ाची पाने वाहिल्यानंतर भाविकांकडून एकमेकांना सदर पाने देण्यात येतील. त्यानंतर पालखीचे परत मंदिरात आगमन होऊन ओवाळणी, पारंपरिक विधी, आरत्या, तीर्थप्रसाद होऊन दसरोत्सवाची सांगता होईल

Related posts: