|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » आदित्य ठाकरेंच्या प्रचारासाठी मुंबईचे डबेवालेही सक्रीय

आदित्य ठाकरेंच्या प्रचारासाठी मुंबईचे डबेवालेही सक्रीय 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील एक व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरतली आहे. मुंबईच्या वरळी मतदार संघातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांना मुंबईतील डबेवाल्यांच्या संघटनेकडून पाठिंबा मिळालाय. मुंबईतील डबेवाले आदित्य ठाकरेंचा प्रचार करताना दिसणार आहेत.

आदित्य ठाकरे उद्या अर्थात गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी, त्यांच्यासोबत डबेवाले कार्यकर्तेही असणार आहेत.

दरम्यान, काल मनसेच्या 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. मात्र, या यादीत वरळी विधानसभा मतदारसंघाचा समावेश नव्हता. वरळीतून मनसेचे संतोष धुरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघात विविध कामं करत आहे. त्यामुळे त्यांचं नाव पहिल्या यादीत येईल अशी अपेक्षा होती.

 

Related posts: