|Friday, February 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » डोकलामपर्यंतचा रस्ता पूर्ण

डोकलामपर्यंतचा रस्ता पूर्ण 

गंगटोक / वृत्तसंस्था :

चीन सीमेनजीक स्वतःच्या रस्त्यांच्या जाळे विस्तारण्याचे काम भारत वेगाने साकारत आहे. डोकलाम पठारानजीकच्या भारतीय सीमेपर्यंत जाणारा रस्ता भारताने अलिकडेच पूर्ण केला आहे. डोकालापर्यंत जाणारा हा रस्ता पूर्ण झाल्याने भारतीय सैन्याला तेथे त्वरित पोहोचता येणार आहे.

डोकलाम येथील चीनशी झालेल्या वादानंतर रस्तेनिर्मितीच्या कामाला वेग देण्यात आला होता. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने हे काम पूर्ण केला आहे. पूर्व सिक्कीमच्या कुपुप येथून ट्राय जंक्शन भीम बेस डोकालापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्याच्या निर्मितीमुळे अश्वाच्या मदतीने तसेच पायी जाण्यास लागणारा 6 तासांचा कालावधी आता 40 मिनिटांवरा आला आहे.

भीम बेस डोकालाला जोडणाऱया आणखी एका प्रकल्पाचे काम वेगाने केले जात आहे. एक्सिस फ्लॅग हिल-मधुबालाहून डोकलामपर्यंत पोहोचणार आहे. या भागात वर्षातील केवळ 100 दिवसच काम करता येते. येथील भाग आणि हवामान अत्यंत प्रतिकूल असल्याने निर्मितीकार्यात वारंवार अडथळे निर्माण होतात.

जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसामुळे अडचणी निर्माण होतात. तर भूस्खलनामुळे रस्त्यांची हानी होण्याचे प्रकार तेथे अधिक प्रमाणात घडतात.  अशा स्थितीत केवळ 15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबरपर्यंत तेथे काम होते. हिमवृष्टीनंतर 15 एप्रिल ते 15 मेपर्यंत काम करणे शक्य ठरते. तसेच हा भाग अभयारण्यात मोडत असल्याने विविध परवानगी प्राप्त करण्यासही मोठा कालावधी लागला आहे. बीआरओला अनेक महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या निर्मितीचे कार्य सोपविण्यात आले आहे. नाथुला खिंडीपर्यंत जाणारा मार्ग अत्याधुनिक पद्धतीने निर्माण केला जातोय. पूर्ण सिक्कीममध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला जातोय.

भारत आणि चीन यांच्यात 3500 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची सीमा आहे. सिक्कीम राज्यात 220 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. सिक्कीम क्षेत्रात भारताला चीनच्या तुलनेत भौगोलिक अनुकुलता प्राप्त आहे. चीन स्वतःच्या भागात अत्यंत वेगाने विकासकामे घडवून आणत आहेत.

Related posts: