|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » आण्विक युद्ध झाल्यास 12.5 कोटी जणांना धोका

आण्विक युद्ध झाल्यास 12.5 कोटी जणांना धोका 

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील हल्ल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान कुठल्याही प्रकारची चर्चा बंद आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आण्विक युद्ध झाल्यास 12.5 कोटी लोक मारले जाण्याची भीती असल्याचे अमेरिकेच्या एका अध्ययनात म्हटले गेले आहे. तसेच जगभरात आण्विक युद्धामुळे उपासमारीचे संकट निर्माण होऊ शकते.

भारताकडून जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यापासून पाकिस्तानने जगाचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला, पण मुस्लीम देशांनीही त्याला साथ नाकारली आहे. अलिकडेच संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रक्षोभक भाषण करत आण्विक युद्धाची धमकी दिली होती.

कुठेही बॉम्बफेक शक्य

आण्विक युद्ध झाल्यास ते केवळ एका विशिष्ट स्थानी लढले जाणार नाही. अणुबॉम्ब जगात कुठेही पाडविला जाऊ शकतो असे अमेरिकेच्या रटगर्स युनिव्हर्सिटीचे (न्यू ब्रंसविक) अध्ययनकर्ते ऍलन रोबक यांनी म्हटले आहे. त्यांचे अध्ययन ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ या संशोधन नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. यानुसार 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकते. अध्ययनानुसार दोन्ही देश काश्मीर मुद्दय़ावर अनेकदा समोरासमोर ठाकले आहेत. 2025 पर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे एकूण 400 ते 500 अण्वस्त्रs असतील.

मोठय़ा प्रमाणात काळा धूर

अण्वस्त्रांमुळे 16 ते 36 दशलक्ष टन (3600 कोटी टन) कार्बनमिश्रित धूर वायुमंडळावरील आवरणात फैलावणार आहे. काही आठवडय़ातच हा धूर जगभरात फैलावणार आहे. हा धूर सौरकिरणोत्सर्ग शोषण असणार असल्याने तापमान वाढणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

शस्त्रास्त्रांमध्ये पडतेय भर

जगाच्या 9 देशांजवळ अण्वस्त्रs असली तरीही भारत आणि पाकिस्तानकडील अण्वस्त्रांचा साठा वेगाने वाढतोय. 2025 पर्यंत अण्वस्त्रांची क्षमता 15 किलोटन होणार आहे. इतक्याच क्षमतेचा अणुबॉम्ब 1945 मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी येथे टाकला होता असा दावा अहवालाचे सहलेखक रोबक यांनी केला आहे.

धोक्याचे आकलन

या अहवालात आण्विक युद्धानंतर किरणोत्सर्गाचा प्रभाव, वनस्पतींचे अस्तित्व, सूर्याकडून येणारी उष्णता, श्वसनातील त्रास, अन्नपदार्थांची टंचाई, महामारीचा धोका या सर्व बाबींचे आकलन करण्यात आले आहे. दोन्ही देशांदरम्यान तडजोड न झाल्यास दक्षिण आशियात विध्वंसाचा काळाकुट्ट इतिहास लिहिला जाणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. केवळ भारत-पाकिस्तानच नव्हे तर या पूर्ण संशोधनात इस्रायल, चीन, फ्रान्स, रशिया, पॅलेस्टाईन समवेत मध्य आशियातील काही देशांची स्थिती दर्शविण्यातआली आहे. या देशांनाही धोकादायक ठरविण्यात आले आहे. पण भारत-पाकचा मुद्दा सर्वात गंभीर असल्याचे नमूद आहे.

10 वर्षांचा कालावधी

भारत आणि पाक यांच्यात आण्विकयुद्ध झाल्यास त्याच्या परिणामांमधून बाहेर पडण्यास जगाला 10 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागणार असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.

 

 

Related posts: