|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पॅरिस येथे चाकूहल्ला, 4 ठार

पॅरिस येथे चाकूहल्ला, 4 ठार 

पॅरिस / वृत्तसंस्था :

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील पोलीस मुख्यालयात झालेल्या चाकू हल्ल्यात 4 जणांना जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यात अनेक अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. अज्ञात हल्लेखोराने पोलीस मुख्यालयात शिरून अधिकाऱयांवर चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

हल्लेखोराला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती फ्रान्स पोलीस संघाच्या अधिकाऱयाने दिली आहे. तर दुसऱया एका वृत्तअहवालात हल्लेखोर जखमींपैकी एक होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पोलीस मुख्यालय नजीकचे मेट्रोस्थानक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याची माहिती पॅरिसच्या परिवहन विभागाने दिली आहे. पॅरिस पोलीस मुख्यालय नजीकचा परिसर पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात घेतला आहे.

उपलब्ध माहितीनुसार ही घटना स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हल्लेखोराने पोलीस मुख्यालयात बळजबरीने शिरण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यामागील उद्देश अद्याप स्पष्ट होऊ शकलेला नाही. पॅरिस येथील नोट्रे-डेम कॅथेड्रलनजीक हा हल्ला झाल्याचे सांगत पोलीस विभागाच्या प्रवक्त्याने अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

Related posts: