|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » पश्चिम बंगालमध्ये येथे बोट उलटून दोघांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये येथे बोट उलटून दोघांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मालदा :

पश्चिम बंगालमधील मालदा येथे महानंदा नदीत बोट उलटून दोघांचा मृत्यू झाला आहे. 20 जणांना वाचविण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. तर काही जण अद्याप बेपत्ता आहेत. मालदा जिह्यातल्या चंचल पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ही घटना घडली.

बुडालेली बोट बिहारच्या कटिहारमधून पश्चिम बंगालमधील मालदा येथे जात होती. बोटीतून प्रवास करणारे सर्वजण दिनाजपूरमध्ये बैच उत्सव पाहण्यासाठी निघाले होते. या बोटीतून अंदाजे 50 जण प्रवास करत होते. त्यामधील दोघांचे मृतदेह हाती लागले असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्याला वेग आला आहे.

या बोटीत प्रवाशांसह सायकल आणि मोटारसायकलदेखील होत्या. तसेच प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे बोट उलटल्याचे बोलले जात आहे.

Related posts: