|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » टेलिफोन कंपन्यांनी कॉल रिंगची वेळ केली कमी

टेलिफोन कंपन्यांनी कॉल रिंगची वेळ केली कमी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

टेलिकॉम क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी रिलाईन्स जिओने आपल्या ग्राहकांना येणाऱया कॉलची संख्या वाढविण्यासाठी कॉल रिंगची वेळ कमी केली आहे. त्यानंतर स्पर्धक कंपनी एअरटेल आणि आयडिया-व्होडाफोननेही आपल्या कॉल रिंगची वेळ कमी केली आहे.

टेलिकॉम क्षेत्रात जिओने सर्वात आगोदर ही स्पर्धा सुरु केली आहे. त्यानंतर आता जिओप्रमाणेच आयडिया-व्होडाफोन आणि एअरटेलच्या कॉल रिंगची वेळ 25 सेकंदांची असणार आहे. जिओच्या ग्राहकाने अन्य कंपनीच्या ग्राहकाला फोन केल्यावर कॉल रिंग 20 सेकंद वाजून बंद होऊ लागली. फोन डिस्कनेक्ट झाल्यानंतर ज्याला फोन केला होता, तो ग्राहक रिटर्न फोन करतो. त्यामुळे जिओचा खर्च कमी झाला होता.

जिओने लढविलेली ही शक्कल आता व्होडाफोन-आयडिआ आणि एअरटेलनेही अवलंबण्यास सुरुवात केली आहे. व्होडाफोन व एअरटेलने त्यांच्या निर्णयाची माहिती ट्रायला दिली आहे. जिओला प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतल्याचे या कंपन्यांनी नमूद केले आहे.