|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Automobiles » टाटाची पहिली इलेक्ट्रीक कार होणार लाँच

टाटाची पहिली इलेक्ट्रीक कार होणार लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स आपली इलेक्ट्रीक एसयूव्ही Nexon EV पुढील वषी जानेवारी ते मार्च दरम्यान लाँच करणार आहे. टाटाची ही पहिली इलेक्ट्रीक कार असून, ती एकदा चार्ज केल्यावर 300 किलोमीटरपर्यंत धावणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या कारमध्ये झिपट्रॉन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच गाडीच्या बॅटरी पॅकमध्ये ऍडव्हान्स्ड लिथियम आयर्न सेल दिले आहेत. गाडीचे तापमान योग्य राखण्यासाठी लिक्विड कूलिंगची सोय आहे.

झिपट्रॉनमध्ये दिलेला बॅटरी पॅक खूपच मजबूत स्टील कव्हरमध्ये आहे. यापासून आयपी 67 रेटिंग मिळते. आयपी 67 रेटिंग म्हणजेच जास्त वॉटरप्रूफिंग आणि डस्ट प्रोटेक्शन मिळते. टाटा मोटर्स झिपट्रॉन टेक्नॉलॉजी असलेल्या आपल्या इलेक्ट्रकि कार्सच्या बॅटरीवर आणि मोटरवर आठ वर्षांची वॉरंटी देणार आहे. या गाडीचा परफॉर्मन्स, रेंज आणि सेफ्टीकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे.

भारतीय बाजारात या गाडीची किंमत 15 ते 17 लाख रुपयांपर्यंत असणार आहे. या कारची टक्कर इलेक्ट्रिक महिंद्रा एक्सयूव्ही 300 शी होणार आहे. महिंद्रा एक्सयूव्ही 300 वर्ष 2020 च्या दुसऱया सहामाहीत लाँच होण्याची शक्मयता आहे.

Related posts: