|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण समस्येवर न्यायालयीन किंवा राजकीय तोडगा

खाण समस्येवर न्यायालयीन किंवा राजकीय तोडगा 

मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीयमंत्र्यांची घेतली भेट

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी न्यायालयीन किंवा राजकीय पद्धतीने तोडगा काढण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचीही भेट घेतली.

गोव्यातील खाण व्यवसाय सुरु व्हावा यासाठी गोवा सरकारने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीत खाणी सुरू करण्यासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाली. केंद्रीय खाण सचिवांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली. डिसेंबर 2019 पर्यंत न्यायालयीन पद्धतीने किंवा राजकीय पद्धतीने तोडगा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारने तसे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

गृहमंत्री अमित शहांशी खाणींसंदर्भात टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी गोव्यातील खाण व्यावसायासंदर्भात महत्वाची चर्चा झाली. गोव्यतील खाण संदर्भात तोडगा काढण्यासाठी स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या गटासोबत लवकरच गृहमंत्री अमित शहा बैठक घेणार आहेत. या बैठकीत गोव्यातील खाण व्यावसायाबाबत तोडग्यासंदर्भात महत्वपूर्ण असा निर्णय होऊ शकतो. गोव्यातील खाण व्यावसाय सुरू व्हायला हवा याबाबत केंद्र सरकारही सकारात्मक आहे. त्याचबरोबर गोव्यातील खाण व्यावसायाबाबत केंद्र सरकारला पूर्ण माहिती आहे, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

कायद्यात बदल करून किंवा न्यायालयीन पर्याय

गोव्यातील खाण व्यावसायासंदर्भात सुमारे अर्धा तास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यात यावेळी वेगवेगळय़ा पर्यायाबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर मागील बैठकीत घेतलेल्या निर्णयावरही चर्चा करण्यात आली. कायद्यात बदल करून किंवा न्यायालयीन पद्धतीने तोडगा काढता येतो का या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. डिसेंबर 2019 पर्यंत याबाबत तोडगा निघणे शक्य आहे. केंद्र सरकारही याबाबत 

Related posts: