|Friday, October 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. 6 ते 12 ऑक्टोबर 2019

मेष

बुध, हर्षल प्रतियुती, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल. चर्चा यशस्वी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात जवळचे नेते, सहकारी यांच्याबरोबर वाटाघाटी करता येतील. अहंकाराला महत्त्व न देता काम करा. ध्येय गाठा. घरातील चिंता कमी होईल. नोकरीत काम करतांना लक्ष ठेवा. चूक करू नका. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात प्रसिद्धीच्या मागे न लागता काम करा. ओळखीतून काम मिळेल.


वृषभ

चंद्र,मंगळ त्रिकोण योग, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात समस्या येऊ शकते. प्रेमाने नोकरांच्या बरोबर वागा. चर्चा करताना संयम ठेवा. काम मिळवता येईल. राजकीय- सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व टिकून राहील. जनहितासाठी ठरविलेली योजना पूर्ण करा. आत्मविश्वासाने तुमच्या कार्यात प्रगती करता येईल. घरात किरकोळ वाद संभवतो. महत्त्वाची वस्तू नीट ठेवा. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नोकरीत वर्चस्व राहील. मोह टाळा.


मिथुन

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, शुक्र, हर्षल प्रतियुती होत आहे. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळेल. सोमवार, मंगळवार प्रवासात सावध रहा. वाद वाढवू नका. घरातील समस्या सोडवता येतील. राजकीय, सामाजिक कार्यात चर्चा करताना संयम ठेवा. वरि÷ांचा मान ठेवा. लोकप्रियता मिळेल. कला- क्रीडा- साहित्य क्षेत्रात नावलौकिक होईल. नवीन मोठय़ा लोकांच्या ओळखी होतील. नोकरीत प्रगती होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.


कर्क

सूर्य,चंद्र त्रिकोण योग, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. बुधवार, गुरुवार घरात तणाव होईल. धंद्यात नोकरवर्ग अडचण निर्माण करण्याची शक्मयता आहे. जमीन, घर या संबंधी वाद लवकर मिटवण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. योजनांना गती देऊन पूर्ण करा. लोकप्रियता मिळवा. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. नवे काम मिळेल. कोर्टकेस लवकर संपवा.


सिंह

सूर्य, चंद्र त्रिकोण योग, बुध, हर्षल प्रतियुती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला धावपळ होईल. मनाविरुद्ध एखादे काम करावे लागेल. घरातील व्यक्ती मदत करतील. जीवनसाथी, मुले यांच्यातील मतभेद मिटवता येईल. धंद्यात वाढ करता येईल. ओळखीचा उपयोग करून घ्या. जमीन, घर या संबंधीचे काम करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात, दौऱयात तुमचे वर्चस्व वाढेल. लोकांचे सहकार्य मिळेल. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी कराल. प्रसिद्धी मिळेल.


कन्या

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. तुमच्या क्षेत्रातील कठीण,  न होणारी कामे आताच करून घ्या. बुधवार, गुरुवार तुमचा राग वाढेल, अशी घटना घडण्याची शक्मयता आहे. ताळमेळ सोडू नका. धंद्यात मोठे काम मिळेल. फायदा होईल. नवीन ओळखी होतील. राजकीय सामाजिक कार्याला गती देता येईल. वरि÷ तुमच्या कामावर खूष होतील. घर, वाहन घेण्याचा विचार कराल. प्रवासाचा आनंद घेता येईल.


तुळ

 बुध, हर्षल प्रतियुती, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यातील अडचणी करता येतील. नोकरवर्गाचा प्रश्न सुटेल. मागील येणे वसूल करतांना दादागिरी करून चालणार नाही. घरातील कामे होतील. कामे करतांना दुखापत होऊ शकते याकडे लक्ष ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा शब्द हल्लाबोल करणारा ठरू शकतो. अपमान  करण्याचा प्रयत्न होईल. संयम ठेवा. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात चालना देणारी घटना घडेल.


वृश्चिक

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाची कामे करून घ्या. कोर्टकेस यशस्वी होईल. धंद्यात अडचणीवर मात करावी लागेल. नोकर त्रस्त करतील. रागावर ताबा ठेवून गोड बोलून कामे करा. संसारात चिडचिड करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. विजयादशमीला  चांगला समाचार मिळेल. दौऱयात सावध रहा. कला, क्रीडा साहित्य क्षेत्रात चमकाल.


धनु

सूर्य, चंद्र त्रिकोण योग, शुक्र, हर्षल प्रतियुती होत आहे. प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. धंद्यात वाढ करता येईल. मोठे काम मिळवा. थकबाकी वसूल करा. घरात सुखद वातावरण राहील. रेंगाळलेली कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्या. यश मिळेल. दौरा यशस्वी होईल. लोकांच्या मनात स्थान निर्माण करता येईल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात तुमच्या कलागुणांचा विकास घडवणारी घटना घडेल.


मकर

सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. महत्त्वाचा निर्णय धंद्यात घेता येईल. रविवार क्षुल्लक तणाव होईल. मागील येणे वसूल करा. संसारातील समस्या सोडवता येईल. घरातील व्यक्तींना  खूष  कराल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवता येईल. राजकीय सामाजिक कार्याला गती द्या. ध्येय गाठा. वाद करण्यापेक्षा लोकांच्या समस्या सोडवा. प्रति÷ा वाढवा. कला, क्रीडा, साहित्यात प्रसिद्धी मिळेल.


कुंभ

सूर्य, चंद्र षडाष्टक योग, बुध, हर्षल प्रतियुती होत आहे. धंद्यातील समस्या, वाद यावर उपाय शोधता येईल. संसारातील तणाव, अडचणी कमी होतील. मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. विजयादशमीच्या दिवशी राग वाढवणारी घटना घडू शकते. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मत व्यक्त करतांना चौफेर विचार करा. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.


मीन

बुध, हर्षल प्रतियुती, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. अचानक धंद्यात मोठे काम मिळाले तरी अडचण पण येऊ शकते. नोकर माणसे त्रस्त करतील. तुम्हाला तडजोड करून प्रश्न सोडवावा लागेल. घरातील व्यक्तींना नाराज करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व राहील. जनहिताची योजना वेगाने पूर्ण करा. दौऱयात सावध रहा. कला, क्रीडा, साहित्यात नावलौकीक मिळेल. मैत्रीत तणाव होऊ शकतो. व्यसनाने नुकसान होईल.