|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगली : महिलांवर अत्याचार करून सोने लुटणारा आरोपी अटकेत

सांगली : महिलांवर अत्याचार करून सोने लुटणारा आरोपी अटकेत 

जत प्रतिनिधी

जत तालुक्यातील विधवा, निराधार महिलांना एकट्या असताना गाठून तसेच बाहेर गावी जात असताना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर आत्याचार करीत सोने, दागिने लुटणारा नराधमास अटक करण्यात पोलिसांना अख॓र यश आले. मुनीर कुत्बुद्दीन नदाफ असे या आरोपीच॓ नाव आहे.

गेल्या दहा दिवसापूर्वी जत निगडी रस्त्यावर सिद्र्याया मंदिराजवळ या आरोपीने एका 55 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिचे सुमारे 50 हजाराचे सोने लुटले होते. या घटनेनंतर पोलिस देखील चक्रावले होते. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथके नियुक्त केली होती. नदाफ यांने अशाप्रकारच॓ अनेक गुन्ह॓ केल्याची माहिती पुढे येत आहे. हा प्रकार करताना जुन्या मारुती 800 या कारचा वापर नदाफ यांने केला आहे.
आरोपी हा जत शहरातील असल्याचे सांगण्यात येत असून नदाफ याने हा गुन्हा कबुल केल्याची माहिती आहे. आज, त्याला सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अपर पोलिस अधीक्षक मनीषा डूबल, एलसीबी चे प्रमुख पिंगळे यांच्यामार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवाजी गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे व पोलीस कर्मचारी यांनी हा तपास केला.