|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘टिक टॉक’ ला टक्कर देण्यासाठी येणार गुगलचे नवीन ऍप

‘टिक टॉक’ ला टक्कर देण्यासाठी येणार गुगलचे नवीन ऍप 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अवघ्या काही दिवसातच तरुणांमध्ये लोकप्रिय झालेल्या ‘टिक टॉक’ ऍपला टक्कर देण्यासाठी लवकरच गुगलचे नवीन ऍप येणार आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त देले आहे.

‘फायरवर्क’ नावचे अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडीओ शेअरिंग अ‍Ÿप गुगल खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे. चीनची प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट वेबो सुद्धा गुगलप्रमाणेच फायरवर्क खरेदी करण्याच्या विचारात आहेत.

फायरवर्क ऍप शॉर्ट व्हिडिओ मोकिंग आणि शेअरिंगसाठी प्रसिद्ध आहे. ते टिक टॉकपेक्षा काहीशे वेगळे आहे. मागील महिन्यातच या ऍपने भारतात एन्ट्री केली आहे. टिक टॉकमध्ये फक्त 15 सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवता येतो. मात्र, टिक टॉकमध्ये फक्त 15 सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवता येतो. व्हर्टिकल व्हिडीओसोबतच हॉरिजॉन्टल व्हिडीओसुद्धा शूट करू शकतो. फायरवर्क अ‍Ÿप अँड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे अ‍Ÿप वापरणाऱया युजर्सची संख्या 10 लाखांपेक्षा अधिक आहे. भारतातही फायरवर्क अ‍Ÿपला चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा गुगलने केला आहे. फंड रेजिंगमध्ये फायरवर्कला या वर्षाच्या सुरूवातीला 100 मिलियन डॉलर नफा प्राप्त झाला आहे.