|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पराभवाच्या भीतीनेच षड्यंत्र!

पराभवाच्या भीतीनेच षड्यंत्र! 

दत्ता सामंत यांची शिवसेनेवर टीका : अपक्षाची भीती वाटते, यातच माझे यश!

प्रतिनिधी / मालवण:

उमेदवारी अर्जात कोणतीही चुकीची माहिती भरली नाही अगर माहिती लपविण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या विजयाची भीती शिवसेनेच्या मनात निर्माण झाल्याने त्यांच्याकडूनच उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याचे षड्यंत्र रचले गेले. याचा परिणाम मतदारांमध्ये शिवसेनेबद्दल प्रचंड चीड निर्माण करणारी ठरली आहे. मी तर अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराची भीती आमदार आणि शिवसेनेला वाटावी, यातच सर्वकाही आले. प्रांताधिकाऱयांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासल्यावर हकरतींमध्ये कसा शिवसेना आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केला हे जनतेसमोर येईल, असे स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कुंभारमाठ येथील आपल्या निवासस्थानी सामंत बोलत होते. त्यांनी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. विकास कुडाळकर, सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, राजा गावडे, बाबू बिरमोळे, राजू परुळेकर, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, राजू देसाई, संदीप भोजने, आबा हडकर, भाग्यता वायंगणकर, राजन माणगावकर, महेंद्र चव्हाण, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.

शिवसेनेला लागली पराभवाची चाहूल!

प्रांताधिकारी उमेदवारी अर्जातील सूचीबाहेरील हरकतींवर निर्णय देताना उमेदवारी अर्ज वैध ठरवून हरकत नोंदविणाऱयांना न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश देऊ शकले असते. मात्र, त्यांनी दबावाखाली येऊन आपल्या विरोधात निर्णय दिला. यातून शिवसेना आमदारांना पराभवाची चाहूल लागल्याने त्यांनी केलेली धडपड मतदारांपर्यंत पोहोचली आहे, असा टोला सामंत यांनी लगावला.
प्रशासन दबावाखाली  वावरतेय!

 प्रत्यक्षात मी माझ्या नावावरचा ठेका रद्द करावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन महिन्यांपूर्वीच पत्र दिले होते. त्याची पोच मला उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी दिली. त्यानुसार मी प्रतिज्ञापत्र सादर केले. हरकतीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागितलेल्या माहितीत मी अधिकृत ठेकेदार नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले. तर दुसरीकडे तालुक्मयात त्यांचे एक काम
प्रगतीत आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तरातील विसंगतीमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी या विषयाचा चेंडू न्यायालयात टाकून माझा अर्ज वैध ठरविणे अपेक्षित होते. बांधकाम विभागाकडे सर्वसामान्य माणसाने माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, तर पंधरा दिवस घेतात, मात्र आमदारांनी अर्ज केल्यानंतर त्याच दिवशी माहिती देण्यात आली हाही षड्यंत्राचाच भाग आहे. 4 ऑक्टोबरला आमदारांनी बांधकाम विभागाकडे माहिती मागितली होती, असेही सामंत म्हणाले.

कर चुकविणारे आमदार!

  मी व नाईक व्यावसायिक आहोत. मात्र, गेल्या काही वर्षात मी शासनाचा भरलेला कर व नाईकांनी भरलेला कर पाहता ते शासनाचा मोठय़ा प्रमाणात कर बुडवित असल्याचे दिसत आहेत. कोल्हापुरातील ठेकेदाराच्या नावावर त्यांचाच भाऊ जिल्हय़ात कामे करतो, हे मतदारांनी पाहिले आहे, असा आरोपही त्यांनी केला.