|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गुहागरमध्ये सात वर्षीय बालिकेवर लैगिक अत्याचार

गुहागरमध्ये सात वर्षीय बालिकेवर लैगिक अत्याचार 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

तालुक्यातील एका गावातील सात वर्षे बालिकेला आपण गुरे  बांधण्याच्या ठिकाणी  काठी शोधावयास जाऊया  असे सांगून  तिच्यावर  लैगिक अत्याचार केले. यादरम्यान  तिची आई  जंगलामध्ये  लाकडे गोळा करायला गेली होती.  घरी आल्यावर  आपली मुलगी रडते का  म्हणून तिची विचारणा केली असता  तिने  आपल्यावर शुभम च्या पप्पांनी केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. याप्रकरणी तिच्या आईने गुहागर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून आरोपी प्रकाश शंकर वाघे वय 40 याला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे आरोपीवर 376 (3) अ ब, पोक्सो 4 7 8 11 12  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related posts: