|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महामार्गावर भीषण अपघातात दापोलीतील 35 जण जखमी

महामार्गावर भीषण अपघातात दापोलीतील 35 जण जखमी 

दोन टेम्पो ट्रव्हलर-कंटेनरमध्ये विचित्र धडक

प्रतिनिधी/ दापोली

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावजवळील ढालघर फाटा येथे दापोली येथील 2 खासगी टेम्पो ट्रव्हलर व कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण व विचित्र अपघातात दापोलीतील 35 जण जखमी झाले. यातील 7 प्रवासी जखमी गंभीर जखमी असून त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे. यातील कृष्णा बनकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील सर्व प्रवासी हे दापोली तालुक्यातील बुरोंडी-कोळथरे परिसरातील असल्याचे समजते. हा अपघात रविवारी पहाटे 3.45 वाजता घडला.

  या अपघातातील जखमी होवून घाटकोपर सावळा हॉस्पिटलमध्ये असलेल्या रूग्णांमध्ये समीर गोवले (29, गोवलेवाडी, कोळथरे), जगदीश दत्ताराम गोवले (26, गोवलेवाडी, कोळथरे), अंजली अरविंद शिगवण (55, गोमराई) आणि परळ, केईएम हॉस्पिटलमध्ये असलेल्या रूग्णांमध्ये दत्ताराम रेमजे (45, गोमराई), प्रिती पांडुरंग  रेमजे (45, गोमराई) तसेच सायन हॉस्पिटलमध्ये असलेल्या रूग्णांमध्ये कृष्णा बैकर (50, आडीवाडी, बोरीवली), प्रियांका बैकर (45, आडीवाडी, बोरीवली) यांचा समावेश आहे.  उर्वरित जखमी प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत.

  हे सगळे दसऱयाच्या सणानिमित्त गावी येत असताना हा अपघात घडला. या घटनेतील मालवाहू कंटेनर हा गोव्याकडून मुंबईकडे जात होता. तर या दोन गाडय़ा दापोलीकडे येत होत्या. यातील पुढे असणाऱया गाडीला कंटेनरची धडक बसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यानंतर ही बस कंटेनरच्या धक्क्याने दापोलीकडे येणाऱया दुसऱया मिनी बसवर आदळली. यामुळे दोन्ही बसमधील प्रवासी जखमी झाले. यानंतर कंटेनरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. 

  या अपघातातील सर्व जखमींवर मुंबई येथे केईएम, सावळा, सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील तिघे प्रवासी सायंकाळी उशिरापर्यंत शुद्धीवर आले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मुंबईस्थित मात्र मुळचे दापोली तालुक्यातील असलेले अनिकेत खळे, प्रशांत दवंडे, योगेश गोवले, अक्षय बैकर हे मुबंईमध्ये हॉस्पिटलसाठी आवश्यक ती मदत करत आहेत.

जुगार अड्डय़ावरील पोलिसांच्या

धाडीत 11 जण अटकेत

-चिपळूण-बहाद्दूरशेख नाका येथील घटना

-2 लाखाचा मुद्देमाल जप्त

-नव्या डीवायएसपींचा दणका

06CH06.JPG

चिपळूण : अटक केलेल्या जुगाऱयांसह नवनाथ ढवळे, देवेंद्र पोळ आदी.

चिपळूण

शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱया बहाद्दुरशेख नाका येथील एका घराच्या दुसऱया मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्डय़ांवर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शनिवारी सायंकाळी 6 वाजता धाड टाकली. यात 11जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख 19 हजार 831 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला. ढवळे यांनी ही धडक कारवाई केल्याने येथील अवैध धंदे करणाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.

संदीप श्रीराम साळवी (45, कापसाळ), सचिन रघुनाथ कमलाकार (34, काविळतळी), सुभाष रामचंद्र खांबे (51, कान्हे, खांबेवाडी), पांडुरंग गोविंद कदम (60, मार्कंडी), भुनवर रजामियॉ जमादार (65, खेंड), परिमल कमलाकर वाडकर (56, खेंड), लक्ष्मण रत्नू शिगणव (67, ओझरवाडी), विकी अशोक गोरिवले (39, काविळतळी), समीर रघुनाथ कमलाकर (37, काविळतळी), संदेश अशोक राऊत (43, कापसाळ-मोरेवाडी), बेबी गोपाळ राठोड (बहादूरशेखनाका) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

बहाद्दूरशेख नाका या ठिकाणी मुत्तप्पन मंदिराशेजारील राधाकृष्णनगरमध्ये बेबी राठोड याच्या घराच्या दुसऱया मजल्यावर एका खोलीत जुगार अड्डा चालवला जात होता. याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी ढवळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शनिवारी येथे पथकासह छापा मारला व 11 जणांना रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईत रोख रक्कम 10 हजार 31 रुपये, 10 हजार किंमतीचे 6 मोबाईल, 9 हजार 200 रुपये किंमतीच्या टेबल-खुर्च्या, स्टूल, पॅट, 1 लाख 90 हजार रूपये किंमतीच्या दोन रिक्षा, दोन दुचाकी असा 2 लाख 19 हजार 831 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, समद बेग, धामापूरकर, पोलीस नाईक इम्रान शेख, महेश जाधव, मनोज कुळे, अतुल ठाकूर, महेंद्र केतकर, वैभव शिवलकर, पंकज पडेलकर, अमित पवार आदींच्या पथकाने केली.

ढवळे यांचा कारवाईचा धडाका

काही दिवसांपूर्वी येथील पदभार स्वीकारलेल्या ढवळे यांनी रात्रीच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक करणाऱया दोन गाडय़ा पकडून मालकांसह चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्या पाठोपाठ जुगार अड्डय़ावर धाड मारून मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

 

 

नोकरीच्या नैराश्यातून

तरूणाची आत्महत्या

मृताचा फोटो प्रसाद कुलकर्णी नावाने आह़े

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कायमस्वरूपी नोकरी नसल्याच्या नैराश्यातून तरूणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल़ी  हा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी 1 च्या सुमारास उघडकीस आल़ा  प्रसाद दिलीप कुलकर्णी (29, ऱा सन्मित्रनगर रत्नागिरी) असे या मृत तरूणाचे नाव आह़े

मृत प्रसाद याचे वडील दिलीप कुलकर्णी यांनी या घटनेची खबर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिल़ी प्रसाद हा कायमस्वरूपी नोकरीला नसल्याने तो तणावाखाली होत़ा यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितल़े दिलीप कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ते आपल्या पत्नीसह लांजा येथे गेले होत़े यावेळी त्यांनी प्रसाद याला आपण तिकडेच वस्ती करणार असून रविवारी सकाळी घरी येवू, असे फोन करून सांगितले होत़े

दरम्यान रविवारी सकाळी दिलीप कुलकर्णी हे पत्नीसह सान्मित्रनगर येथील घरी आल़े  यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांना दिसून आल़े  यावेळी त्यांनी प्रसाद याला फोन करण्याचा प्रयत्न केल़ा  मात्र कोणताही प्रतिसाद त्यांना मिळाला नाह़ी  अखेर दुपारी 1 च्या सुमारास दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केल़ा  यावेळी प्रसादचा मृतदेह बेडरूमच्या पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल़ा या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आह़े

 

Related posts: