|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जुगार अड्डय़ावरील पोलिसांच्या धाडीत 11 जण अटकेत

जुगार अड्डय़ावरील पोलिसांच्या धाडीत 11 जण अटकेत 

चिपळूण-बहाद्दूरशेख नाका येथील घटना

चिपळूण

शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱया बहाद्दुरशेख नाका येथील एका घराच्या दुसऱया मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्डय़ांवर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शनिवारी सायंकाळी 6 वाजता धाड टाकली. यात 11जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख 19 हजार 831 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला. ढवळे यांनी ही धडक कारवाई केल्याने येथील अवैध धंदे करणाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.

संदीप श्रीराम साळवी (45, कापसाळ), सचिन रघुनाथ कमलाकार (34, काविळतळी), सुभाष रामचंद्र खांबे (51, कान्हे, खांबेवाडी), पांडुरंग गोविंद कदम (60, मार्कंडी), भुनवर रजामियॉ जमादार (65, खेंड), परिमल कमलाकर वाडकर (56, खेंड), लक्ष्मण रत्नू शिगणव (67, ओझरवाडी), विकी अशोक गोरिवले (39, काविळतळी), समीर रघुनाथ कमलाकर (37, काविळतळी), संदेश अशोक राऊत (43, कापसाळ-मोरेवाडी), बेबी गोपाळ राठोड (बहादूरशेखनाका) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

बहाद्दूरशेख नाका या ठिकाणी मुत्तप्पन मंदिराशेजारील राधाकृष्णनगरमध्ये बेबी राठोड याच्या घराच्या दुसऱया मजल्यावर एका खोलीत जुगार अड्डा चालवला जात होता. याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी ढवळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शनिवारी येथे पथकासह छापा मारला व 11 जणांना रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईत रोख रक्कम 10 हजार 31 रुपये, 10 हजार किंमतीचे 6 मोबाईल, 9 हजार 200 रुपये किंमतीच्या टेबल-खुर्च्या, स्टूल, पॅट, 1 लाख 90 हजार रूपये किंमतीच्या दोन रिक्षा, दोन दुचाकी असा 2 लाख 19 हजार 831 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, समद बेग, धामापूरकर, पोलीस नाईक इम्रान शेख, महेश जाधव, मनोज कुळे, अतुल ठाकूर, महेंद्र केतकर, वैभव शिवलकर, पंकज पडेलकर, अमित पवार आदींच्या पथकाने केली.

ढवळे यांचा कारवाईचा धडाका

काही दिवसांपूर्वी येथील पदभार स्वीकारलेल्या ढवळे यांनी रात्रीच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक करणाऱया दोन गाडय़ा पकडून मालकांसह चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्या पाठोपाठ जुगार अड्डय़ावर धाड मारून मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

Related posts: