|Sunday, January 26, 2020
You are here: Home » leadingnews » आरेतील वृक्षतोडीला तुर्तास स्थगिती : सुप्रीम कोर्ट

आरेतील वृक्षतोडीला तुर्तास स्थगिती : सुप्रीम कोर्ट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सर्वोच्च न्यायालयाने आरेतील वृक्षतोडीवर तुर्तास स्थगिती आणली आहे. तसेच परिसरातील परिस्थिती जैसे थे करावी, असेही न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले आहे.

कुलाबा-वांदे-सीप्झ या भुयारी मेट्रो तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आंदोलने सुरु आहेत. या परिसरात नाकाबंदी आणि जमावबंदी कायम आहे. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे आरेमधील वृक्षतोडीकडे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने विद्यार्थ्यांची दखल घेत त्या जनहित याचिकेवर आज निर्णय दिला. त्यामध्ये कोर्टाने 21 ऑक्टोबरपर्यंत आरेतील वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे.

आरेतील वृक्षतोडीविरोधात विरोधी पक्षांसह पर्यावरणप्रेमीही एकवटले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांचाही सक्रीय सहभाग होता. मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील झाडे तोडण्यात येऊ नये, अशी मागणी करणाऱया सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या होत्या. त्याच रात्री हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्यानंतर या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात 29 आंदोलकांना अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. शनिवारी रात्रीपर्यंत आरेतील 2,185 झाडे तोडण्यात आली आहेत.

Related posts: