|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » नाशिक : अशोक मुर्तडक यांची माघार

नाशिक : अशोक मुर्तडक यांची माघार 

ऑनलाइन टीम / नाशिक : 

नाशिक पूर्वमधून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पूर्व मध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादीत लढत होणार आहे. मुर्तडक यांच्या माघारीमुळे पूर्व मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार एडवोकेट राहुल ढिकले व भाजपमधून ऐनवेळी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आमदार बाळासाहेब सानप यांच्यात थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

पुण्यातील कोथरूड मध्ये भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेच्या शिंदेंना राष्ट्रवादी, काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याची परतफेड नाशिक मध्ये मनसेने केली आहे .मुंबईत झालेल्या मनसे पदाधिकारी बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

सानप आणि मुर्तडक एकाच समाजाचे असल्याने मतविभागणीचे संकट दोन्ही पक्षांसमोर होते. मात्र, आता मनसेने माघार घेतल्यामुळे आणि अन्य विरोधकांच्या पाठींब्यामुळे इथं भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये सरळ लढत आहे. नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीकडून आमदार देवयानी फरांदे या उमेदवार आहेत. फरांदे यांच्या विरोधतील मतविभागणी टाळण्यासाठी काँग्रेसने माघार घेऊन मनसेला सोबत घेऊन ही व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे.

नाशिक पूर्वमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्व विधनसभा मतदारसंघातून माघार घेताना नाशिक मध्य चे मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महागडीचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्याप काँग्रेस उमेदवार डॉक्टर हेमलता पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने मनसेची अडचण निर्माण होण्याची शक्मयता आहे.