|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » ताडोबा व्याघ्र प्रकल्प : मीरा वाघिणीचा मृत्यू

ताडोबा व्याघ्र प्रकल्प : मीरा वाघिणीचा मृत्यू 

ऑनलाइन टीम / चंद्रपूर : 

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मीरा वाघिणीचा मृत्यू झाला आहे. या वाघिणीचं वय अंदाजे दोन वर्ष होतं. ताडोबा तलाव परिसरात आज सकाळी तिचा मृतदेह आढळला. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्वात प्रसिद्ध वाघीण असलेल्या माया वाघिणीची ती बछडी होती.

दोन दिवसांपूर्वी ताडोबा तलाव परिसरात माया आणि तिची दोन पिल्लं रानगव्याची शिकार करत होते. या दरम्यान रानगव्याची शिंगं मीराच्या छाती आणि पोटात खुपसली. ही माहिती मिळताच ताडोबा प्रशासनाने तिच्या जखमा किती गंभीर आहे याचा अंदाज काढण्यासाठी तिची रेकी सुरु केली. मात्र या बाबत कुठला निष्कर्ष काढण्याआधीच तिचा मृत्यू झाला. ताडोबा प्रशासनाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ताडोबा तलाव परिसरात तिचा मृतदेह आढळून आला आहे.