|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » सुजय विखेंना 2 हजारांचा चेक

सुजय विखेंना 2 हजारांचा चेक 

नगर, पुणे / प्रतिनिधी : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले 2 हजार रुपये शेतकऱयांना चालतात, मग भाजपचे कमळ का नको, असा सवाल करणाऱया खासदार सुजय विखे-पाटील यांच्या वक्तव्याचा नगरमधील शेतकऱयांच्या मुलांनी विखे तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्याचबरोबर 2 हजार रुपयांचा चेक स्पीड पोस्टाद्वारे पाठवत त्यांना चोख उत्तरही दिले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारसभेत सुजय यांनी शेतकऱयांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शेतकरी बांधवांकडून संताप व्यक्त होत आहे. दोन हजारांत आपली किंमत करू पाहणारे सुजय, त्यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील तसेच राम शिंदे व भाजपला मतदान करू नका, असे आवाहनही या तरुणांनी केले आहे.

‘पालकमंत्र्यांनी विरोधी उमेदवाराच्या सभेला जाणाऱया लोकांची यादी काढावी. त्या सभेला जाणाऱया अनेकांच्या खात्यात मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको? तुम्हाला कम?ळ चालत नसेल, तर ते पैसे परत करा, आम्हाला गरीबांच्या कल्याणासाठी तरी वापरता येतील,’ असे विधान सुजय यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे. विखेंच्या वक्तव्याचा निषेध म्हणून काही तरुणांनी त्यांना 2 हजार रुपयांचा चेक पाठवला आहे. त्याचबरोबर एक जाहीर निवेदनही काढले आहे. आम्ही सुजय विखेंना दोन हजार रुपये पाठवत आहोत. त्यांनी लोणीमध्ये कमळ सोडून अन्य कुणालाही मत द्यावे, असे आवाहन या निवेदनातून करण्यात आले आहे.

 

Related posts: