|Friday, October 18, 2019
You are here: Home » उद्योग » आधार कार्डसाठी लॉक-अनलॉकची सुविधा

आधार कार्डसाठी लॉक-अनलॉकची सुविधा 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आधार कार्डचा वापर सर्वच ठिकाणी वाढला आहे. तसेच लोकांची खासगी माहिती आधार कार्डशी जोडण्यात आलेली आहे. मात्र, यावरील टाटा चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांना मोठे नुकसान झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यावर उपाय म्हणून यूनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) कार्डधारकांसाठी आधार नंबर लॉक अथवा अनलॉक करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

आधार कार्डच्या या नव्या सुविधेमुळे डाटा सुरक्षित ठेवता येणार आहे. याचबरोबर आधार कार्डद्वारे होणारी फसवणूक थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही सुविधा एखाद्या लॉकप्रमाणे काम करणार आहे. त्यामुळे दुसऱया कोणत्याही व्यक्तीला ते आधार कार्ड अनलॉक करता येणार नाही. याचबरोबर हॅकर्स आधार व्हेरिफिकेशन करू शकणार नाहीत. ही सुविधा वापरण्यासाठी कार्डधारकांना आपल्या रजिस्टर क्रमांकावरून आधार कार्ड लॉक करण्यासाठी एसएमएस पाठवावा लागेल.

लॉक करण्यासाठी…

आधार क्रमांक लॉक करण्यासाठी कार्डधारकांना 1947 या नंबरवर गेटओटीपी असे इंग्रजीमध्ये लिहून पाठवावे लागेल. त्यानंतर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. त्यानंतर कार्ड धारकाला लॉकयुआयडी आणि आधार क्रमांक लिहून 1947 वर पाठवावा लागेल.

अनलॉक करण्यासाठी…

आधार नंबर अनलॉक करण्यासाठी कार्डधारकांना 1947 या नंबरवर गेटओटीपी असे लिहून पाठवावे लागेल. 6 आकडी ओटीपी मिळाल्यानंतर अनलॉकयुआयडी आधार नंबर आणि ओटीपी लिहून 1947 वर पाठवावा लागेल.