|Friday, October 18, 2019
You are here: Home » उद्योग » जागतिक स्तरावर कर्मचारी कपातीचे संकट

जागतिक स्तरावर कर्मचारी कपातीचे संकट 

एचपी भारतातील 500 कर्मचाऱयांना करणार कमी

वृत्तसंस्था/ बेंगळूर

कॉम्प्यूटर क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी एचपीने सर्व जगभरात कर्मचारी कपात करण्याची निर्णय घेतला आहे. कंपनी जगभरातील एकूण 9 हजारांपर्यंत कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. त्यामधील भारतातील कंपनीच्या 500 कर्मचाऱयांवर कपातीचे संकट ओढवू शकते, असे तज्ञांचे मत आहे.

एच. पी. इंडियाकडे जगभरात एकूण 55 हजार कर्मचारी कार्यरत आहेत.  2022 पर्यंत जागतिक स्तरावर कंपनी 7 ते 9 हजारांचे मनुष्यबळ कमी करणार  आहे. आम्ही हे पाऊल ऑपरेशन्स रिस्ट्रक्चरिंगच्या अंतर्गत उचलत आहे, असे कंपनीने गेल्या आठवडय़ात सांगितले आहे.

एचपी इंडियावरही कंपनीच्या कॉस्ट सेव्हिंग प्लानचा परिणाम होईल, देशात पर्सनल कॉम्प्युटरची संख्या कमी होत आहे. भारतात कर्मचारी कपात होणार आहे. कंपनीने काही मॉडेल्सची निर्मिती थांबवली आहे आणि वाढ घटते आहे, असे कंपनीच्या जाणकारांकडून सांगण्यात आले आहे.

निश्चित आकडेवारी ठरलेली नाही…

एचपीने भारतात नेमक्मया किती नोकऱया जाणार आहेत याबाबत कोणतीच माहिती दिली नाही. जागतिक स्तरावर कपात केली जाणार आहे आणि कोणत्या ठराविक प्रकल्प किंवा ठिकाणांमध्ये किती कपात होईल, अशी निश्चित आकडेवारी ठरलेली नाही, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

एचएसबीसीतील 10 हजार  कर्मचाऱयांवर टांगती तलवार!

एचएसबीसी बँकेच्या 10 हजार कर्मचाऱयांच्या नोकऱयांवर टांगती तलवार आहे. या कर्मचाऱयांची कपात करण्याचा निर्णय एचएसबीसी होल्डिंग्ज पीएलसीने घेतला आहे. एचएसबीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्विन बँकिंग समुहाचा खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यामुळे ते या नोकरकपातीची योजना तयार करत आहेत. 5 ऑगस्टला एचएसबीसी समूहाचे सीईओ जॉन फ्लिन्ट पदावरून पायउतार झाले. त्यावेळी बँकिंग समूहाचे अध्यक्ष मार्क टकर म्हणाले होते की, ज्या प्रकारच्या आव्हानात्मक जागतिक परिस्थितीत बँक काम करत आहे, ते पाहता संचालक मंडळाचाही असा निर्णय ठरला आहे.