|Friday, October 18, 2019
You are here: Home » उद्योग » वाहन, बँकिंग क्षेत्रातील चढ-उतारामुळे बाजार घसरला

वाहन, बँकिंग क्षेत्रातील चढ-उतारामुळे बाजार घसरला 

वृत्तसंस्था/ मुंबई

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवरी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील 30 कंपन्यांचा निर्देशांक सेन्सेक्स 141.33 अंकांनी (0.38 टक्के) घसरत 37531.98 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 48.35 अंकांनी (0.43 टक्के) घसरून 11126.40 अंकांवर बंद झाला. वाहन, बँकिंग, तेलसह इतर क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग पडल्याने बाजारावर घसरणीचा परिणाम झाला.

मुंबई शेअर बाजारातील ओएनजीसी, टाटा स्टील, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, इंड्सइंड बँक, टाटा मोटर्ससह 22 कंपन्यांचे समभाग कोसळून बंद झाले. तर येस बँक, ऍक्सिस बँक, बजाज ऑटो, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, हिरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स, रिलायन्सचे समभाग मात्र वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये सकाळी वाढ झाल्याचे पाहायला मिळल्यामुळे सेन्सेक्स 37,853 अंकावर बाजार उघडला होता. व्यापार सुरू असताना 37 हजार 919 अंकावर स्तर पोहोचला होता. परंतु, त्यानंतर त्यात घसरण झाल्याचे दिसले.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतील बीपीसीएलच्या समभागामध्ये 5.17 टक्के, जेएसडब्ल्यू स्टीलच्या समभागामध्ये 3.07 टक्के, ओएनजीसीच्या शेअर्समध्ये 2.93 टक्क्मयांसह 32 कंपन्यांच्या समभागामध्ये घसरण पाहायला मिळाली. तर दुसरीकडे येस बँकेमध्ये 7.59 टक्के, झीलमध्ये 5.62 टक्के, ब्रिटानियामध्ये 3.88 टक्के, ऍक्सिस बँकेच्या समभागामध्ये 1.87 टक्के यासह 17 कंपन्यांच्या समभागामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाली.

मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समधील टाटा स्टीलच्या समभागात 2.49 टक्के, ओएनजीसीमध्ये 2.43 टक्के, आयटीसीमध्ये 2.18 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 2 टक्के, इंड्सइंड बँकेमध्ये 1.76 टक्के, टाटा मोटर्स समभागात 1.76 टक्के घसरण पाहायला मिळाली. येस बँकेच्या समभागामध्ये 8.19 टक्के, ऍक्सिस बँकेच्या समभागामध्ये 2.53 टक्के, बजाज ऑटोमध्ये 1.03 टक्के, आयसीआयसीआय बँकेच्या समभागामध्ये 0.62 टक्के वाढ झाली.