|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिराळा, इस्लामपूर, जत भाजपात बंडखोरी

शिराळा, इस्लामपूर, जत भाजपात बंडखोरी 

शिवाजी डोंगरे, प्रशांत शेजाळ यांच्यासह 43 जणांची माघार

प्रतिनिधी/ सांगली

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 43 जणांनी माघार घेतली. यामुळे आठ जागांसाठी 68 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. भाजपा नेत्यांना बंडखोरी रोखण्यात यश आले नसून जत विधानसभा मतदारसंघात डॉ. रवींद्र आरळी, शिराळय़ात माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती कायम ठेवल्याने या मतदार संघातील पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत भर पडली आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपाला काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान मिरज, तासगाव-कवठेमंकाळ खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव आणि सांगली मतदारसंघात दुरंगी तर जत, शिराळा आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

जिह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. शुक्रवार, चार ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. या कालावधीत 125 उमेदवारांचे 165 अर्ज दाखल झाले होते. अर्जांची शनिवारी त्या-त्या विधानसभा मतदारसंघात छाननी करण्यात आली. आठ मतदारसंघातील 14 जणांचे अर्ज अवैध ठरले. यामुळे निवडणुकीसाठी 111 उमेदवारांचे अर्ज राहिले होते. अर्ज माघारी घेण्याचा सोमवारी शेवटची मुदत होती. आठ विधानसभा मतदार संघातून काय करू अखेरच्या दिवशी 43 जणांनी माघार घेतली. निवडणुकीच्या रिंगणात आठ जागांसाठी 68 उमेदवार राहिले आहेत. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिह्यातील आठही मतदारसंघांमध्ये भाजपा-शिवसेना युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. पक्षांतर्गत झालेली बंडखोरी थोपविण्याचे नेत्यांपुढे आव्हान होते, जिह्यात भाजप मधील बंडखोरी रोखण्यात वरिष्ठ नेत्यांना अपयश आले.

जत विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आ. विलासराव जगताप यांच्या विरोधात भाजपा अंतर्गत विकास आघाडीच्या माध्यमातून डॉ. रवींद्र आरळी यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने येथे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहेत. आता जतमध्ये भाजपाचे जगताप, काँग्रेसचे विक्रम सावंत आणि विकासआघाडीचे आघाडीचे डॉ. आरळी यांच्यात तिरंगी लढत होईल. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांनी युतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या विरोधात बंड केले, नगराध्यक्ष पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने तिरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सेनेचे गौरव नायकवाडी आणि भाजपाचे बंडखोर पाटील यांच्यात सामना होईल. शिराळामध्ये भाजपाचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या विरोधात महाडिक गटाचे सम्राट महाडिक यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला. यामुळे येथील भाजपा उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. या मतदारसंघात भाजपाचे आ. नाईक, राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक आणि महाडिक यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान सांगली मतदारसंघात भाजपचे सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात भाजपामधील जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी डोंगरे यांनी अर्ज दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपला काहीसा दिलासा मिळाला असून आ. गाडगीळ आणि काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांच्यात दुरंगी लढत लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

मिरज विधानसभा मतदारसंघातून दहा जणांनी माघार घेतली असून सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी भाजपचे मंत्री सुरेश खाडे आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब मोरे यांच्यात दुरंगी लढत होईल. सांगली मतदारसंघात तिघांनी माघार घेतल्याने अकरा जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात अकरा उमेदवारांपैकी तीन जणांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आठ उमेदवार असून येथे तिरंगी लढत होणार आहे. शिराळा मतदारसंघात अकरा उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्याने नऊ जण मैदानात आहेत. येथे भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष असा तिरंगी सामना होणार आहे. पलूस-कडेगाव मतदार संघात 14 उमेदवारांपैकी पाच जणांनी माघार घेतल्याने नऊ जण निवडणुकीच्या रिंगणात आहे येथे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजीत कदम आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.

खानापूर आटपाडी मतदारसंघात 18 उमेदवारांपैकी सात जणांनी माघार घेतली त्यामुळे 11 उमेदवार रिंगणात  राहिले असून शिवसेनेचे अनिल बाबर आणि अपक्ष माजी आज सदाशिवराव पाटील यांच्या दुरंगी सामना होणार आहे. तासगाव-कवठेमंकाळ मध्ये नऊ उमेदवारांपैकी चार जणांनी माघार घेतल्याने पाच जण निवडणुकीच्या रिंगणात राहिले. राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील आणि शिवसेनेचे अजितराव घोरपडे यांच्यात तिरंगी लढत होईल. वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत शेजाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी माघार घेतली.

विधानसभेसाठी प्रमुख लढती

मतदारसंघ उमेदवार

सांगली : आ. सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पाटील

मिरज : आ. सुरेश खाडे, बाळासाहेब होनमोरे

इस्लामपूर : जयंत पाटील, गौरव नायकवडी, निशिकांत पाटील

शिराळा : शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक, सम्राट महाडिक

पलूस-कडेगाव : डॉ. विश्वजित कदम, संजय विभूते

खानापूर-आटपाडी : अनिल बाबर, सदाशिवराव पाटील

तासगाव-कवठेमहांकाळ : सुमनताई पाटील, अजितराव घोरपडे

जत : विलासराव जगताप, विक्रम सावंत, डॉ. रवींद्र आरळी.

 

Related posts: