|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » करंजेत जुगार खेळणाऱया दहाजणांवर कारवाई

करंजेत जुगार खेळणाऱया दहाजणांवर कारवाई 

प्रतिनिधी/ सातारा

करंजे येथील एकता कॉलनीत सुरु असलेल्या जुगार अड्डय़ावर छापा टाकत शाहूपुरी पोलिसांनी दहाजणांवर कारवाई केली असून याप्रकरणी या सर्वांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या छाप्यावेळी त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व 10 मोबाईल हँडसेट असा एकूण 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जुगार खेळणारे सर्व एकता कॉलनीतील रहिवासी आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील अवैध व्यवसायावरील कारवायांचा धडाका पोलिसांनी सुरु केला आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजे येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हिंमत दबडे-पाटील, कॉन्स्टेबल मोहन पवार, शैलेश फडतरे, ओमकार यादव, स्वप्नील कुंभार यांनी ही कारवाई केली.

या पथकाने जुगार अड्डय़ावर छापा टाकला असता तिथे सुनील दगडू पवार (वय 34), इराक उस्मान इनामदार (वय 39), प्रवीण सुभाष देवकर (वय 39), अकबर हनिफ बागवान (वय 40), विलास तानाजी पवार (वय 37), अस्लम हनिफ शेख (वय 43), सर्जेराव दळवी (वय 30), इरफान अस्लम सय्यद (वय 33, राहूल दादासाहेब शिर्के (वय 30), हरुन हनिफ शेख (वय 50, सर्व रा. एकता कॉलनी, करंजे, सातारा) हे जुगार खेळत होते. पथकाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व दहा मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत. याप्रकरणी या सर्वांना सीआरपीसी 41 (1) प्रमाणे नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचे शाहूपुरी पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.