|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » Automobiles » मारुतीकडून सलग आठव्या महिन्यात उत्पादन कपात

मारुतीकडून सलग आठव्या महिन्यात उत्पादन कपात 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

जागतिक मंदीचा सर्वात जास्त फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसत असून, या क्षेत्रातील मरगळ कायम आहे. मारुती सुझुकीने सलग आठव्या महिन्यात उत्पादन कपात केली आहे. बाजारात वाहनांची मागणी कमी झाल्याने मारुतीला आपल्या उत्पादनात कपात करावी लागत आहे.

मारुती सुझुकीने सप्टेंबर महिन्यात 17.48 टक्क्यांनी उत्पादनात कपात केली आहे. तर प्रवासी वाहतूक करणाऱया उत्पादनात 17.37 टक्क्यांची घट केली आहे. मागणी नसल्यामुळे मारुतीने वाहनांच्या उत्पादनात घट केली असून, मिनी आणि कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये मोडणाऱया अल्टो, न्यू वॅगनआर, सेलेरिओ, इग्निस, स्विफ्ट, बलेनो आणि डिझायरचे उत्पादन मारुतीने 14.91 टक्क्मयांनी कमी केले आहे. तर विटारा ब्रेझा, इर्टिगा, एस-क्रॉस या युटिलिटी व्हिईकल्सचे उत्पादन 17.05 टक्क्मयांनी कमी करण्यात आले आहे. तसेच सेदान सेग्मेंटमध्ये असणाऱया सियाझ कारचे उत्पादनही मारुतीने मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घटविले आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हे उत्पादन तुलनेने जास्त होते.

Related posts: