|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » आदित्य ठाकरेंविरोधात वरळीत 12 उमेदवार

आदित्य ठाकरेंविरोधात वरळीत 12 उमेदवार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात या मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात आहेत.

ठाकरे कुटुंबातील आदित्य हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. आदित्य निवडणूक लढवत असलेल्या वरळीतून 13 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना आपले मताधिक्य वाढविण्यासाठी काहीशी कसरत करावी लागणार आहे.

राज्यातील बंडखोरी थांबविण्यातही भाजप-सेनेला फारशे यश आले नाही. राज्यात 30 विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या इच्छूकांनी बंडखोरी केली आहे. याचा फटका महायुतीला बसणार आहेत. त्यातच ठाकरे कुटुंबातील पहिलाच उमेदवार असलेल्या आदित्य यांच्या विरोधात 12 उमेदवार रिंगणात असल्याने सेनेलाही विजयासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी 8 कोटी 95 लाख 62 हजार 706 मतदारांची नोंदणी झाली आहे.