|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » उदयनराजेंच्या संपत्तीत पाच महिन्यात दीड कोटींची वाढ

उदयनराजेंच्या संपत्तीत पाच महिन्यात दीड कोटींची वाढ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत पाच महिन्यात दीड कोटींची वाढ झाली आहे.

उदयनराजे यांनी मागील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांबरोबरच सातारा लोकसभेचीही पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवणुकीत उदयनराजे भोसले यांच्याकडे 13 कोटी 81 लाखांची जंगम मालमत्ता होती. आता ती 14 कोटी 44 लाखांपेक्षाही अधिक आहे. सोने आणि हिऱयांचे चाळीस किलोचे दागिने आहेत. गाडय़ा आणि इतर मालमत्ता मिळून त्यांची संपत्ती 185 कोटींची आहे. तर 1 कोटी 82 लाखांचे वाहन कर्ज असल्याचे ही त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे.

उदयनराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील निवडणूक लढवत आहेत. पाटील यांच्याकडे 10 कोटींची जंगम, तर 11 कोटींची स्थावर मालमत्ता आहे.