|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » नायजेरीयन तरुणाकडून साडेसात लाखांचे कोकेन जप्त

नायजेरीयन तरुणाकडून साडेसात लाखांचे कोकेन जप्त 

ऑनलाईन टीम / पुणे :

कोकेन विक्रीस आलेल्या एका नायझेरीयन तरुणास अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून 7 लाख 68 हजार रुपये किंमतीचे 130 ग्रॅम कोकेन, 37 हजार 500 रुपयांची रोकड, मोबाईल, पासपोर्ट व दुचाकी असा 8 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

मायकल एडिसन जॉन (रा. वक्रतुंड आंगण, मोरया पार्क, पिंपले गुरव, मूळ रा. नायझेरीया) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश महाडीक यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोपोडी येथील जलशुद्धिकरण केंद्रासमोर एक नायझेरीयन व्यक्ती अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार, खंडणी व अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विजय टिकोले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने संबंधित ठिकाणी सापला रचला. मंगळवारी सकाळी सहा वाजता एक व्यक्ती दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानुसार पोलिसांनी त्यास अटक केली. त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 7 लाख 68 हजार रुपये किंमतीचे 130 गैम कोकेन, 37 हजार 500 रुपयांची रोकड, मोबाईल व पासपोर्ट असा 8 लाख 63 हजार रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. खडकी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Related posts: