|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » सैनिकांसाठी ऑनलाईन मतपत्रिका

सैनिकांसाठी ऑनलाईन मतपत्रिका 

ऑनलाईन टीम / पुणे :

देशभर कर्तव्य बजावणाऱया सैनिकासाठी विधानसभा निवडणुकीत ऑनलाईन मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे. टपाली मतदान प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि मतपत्रिका वेळेत मिळावी यासाठी इलेक्ट्रोनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमच्या (ईटीपीबीएस) माध्यमातून सैनिकांना ऑनलाईन मतपत्रिका पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय निवडणूक निरीक्षक संतोष कुमार यादव, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, टपाली मतप्रक्रिया समन्वय अधिकारी सुनील गाढे तसेच संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत ईटीपीबीएसद्वारे सैनिकांना ऑनलाइन मतपत्रिका पाठविण्यात आली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सैनिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सीडॅकच्या मदतीने इलेक्ट्रोनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम (ईटीपीबीएस) ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे सैनिकांना ऑनलाईन मतपत्रिका पाठवली जाणार आहे. सैनिकांनी या इलेक्ट्रॉनिक मतपत्रिकेचे पिंट काढून मतदान करून ती मतपत्रिका पुन्हा पोष्टाद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे पाठवायची आहे. यामुळे पोस्टल मतपत्रिका सैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी वाचणार आहे व सैनिकांची मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे वेळेत पोहोचणार आहे. या प्रणालीमुळे 100 टक्के नोंदणी झालेल्या सैनिक मतदारांपर्यंत मतपत्रिका पोहचणार आहे.

तसेच यापूर्वी सैनिक मतदारांचे मतदान जे 10 टक्क्मयांपेक्षा कमी असायचे ते या प्रणालीमुळे वाढले असून, मागील लोकसभेच्या निवडणुकीत ते सुमारे 60 टक्क्मयांपर्यंत वाढले. विधानसभेच्या निवडणुकीत ते 70 टक्क्मयांपेक्षा अधिक होण्याची शक्मयता आहे.

Related posts: