|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » पेंटाग्राफवर बॅग फेकल्याने लागली आग; वाशी स्थानकात गोंधळ

पेंटाग्राफवर बॅग फेकल्याने लागली आग; वाशी स्थानकात गोंधळ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात अज्ञाताने लोकलच्या पेंटाग्राफवर ट्रॉली बॅग फेकल्यामुळे आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

सकाळीच हा प्रकार घडल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रवाशांची गैरसोय होत आहे. या मार्गावरील गाडय़ा वीस ते पंचवीस मिनिटे उशीरा धावत आहेत. वाशी रेल्वे स्थानकात अज्ञाताने प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील एका लोकलच्या पेंटाग्राफवर ट्रॉली बॅग फेकली. त्यामुळे पेंटाग्राफने अचानक पेट घेतला आणि धूर सर्वत्र पसरला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर ही गाडी कारशेडकडे रवाना झाली.

ही बॅग पेंटाग्राफवर नेमकी कोणी फेकली याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या सीसीटीव्ही तपासण्याचेही काम सुरु आहे. या मार्गावरील वाहतूक सध्या सुरू झाली असून, ती पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे.