|Friday, October 18, 2019
You are here: Home » उद्योग » ऍमेझॉन / फ्लिपकार्ट : सहा दिवसात विकल्या 19 हजार कोटींच्या वस्तू

ऍमेझॉन / फ्लिपकार्ट : सहा दिवसात विकल्या 19 हजार कोटींच्या वस्तू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दसऱयाच्या मुहूर्तावर फ्लिपकार्ट आणि अमेझॉनच्या संकेतस्थळांवर आयोजित करण्यात आलेल्या सेलमधून या कंपन्यांनी बक्कळ कमाई केली आहे. ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टने 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान सेल आयोजित केला होता. त्यामधून या दोन्ही कंपन्यांनी 19 हजार कोटींच्या वस्तूंची विक्री केली आहे.

सहा दिवसांच्या या सेलमधून या कंपन्या चांगल्याच मालामाल झाल्या आहेत. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर या सेलचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच टप्प्यातील या सेलमध्ये दोन्ही कंपन्यांनी 19 हजार कोटींच्या वस्तू विकल्या आहेत. तर याच महिन्यातील दुसऱया सेलमध्ये ही विक्री 39 हजार कोटींपर्यंत जाऊ शकते.

सहा दिवसांच्या विक्रीमध्ये फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनची भागीदारी तब्बल 90 टक्के होती. यात सर्वाधिक वाटा मोबाईल विक्रीचा होता. विक्री झालेल्या सामानांमध्ये 55 टक्के विक्री मोबाइलच्या श्रेणीतून झाली. बेंगळुरूची रिसर्च कंपनी रेडसीर कंसल्टंसीने ही आकडेवारी दिली आहे.