|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राजर्षी शाहूंच्या शैक्षणिक अस्पृश्यता निर्मूलनाची शताब्दी!

राजर्षी शाहूंच्या शैक्षणिक अस्पृश्यता निर्मूलनाची शताब्दी! 

संजीव खाडे कोल्हापूर 

सामाजिक न्याय, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, यासाठी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले कृतीशिल कार्य दीपस्तंभ ठरले आहे. माणसाला माणसाप्रमाणे वागविणे म्हणजेच सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, हा विचार घेऊन शाहू महाराजांनी आपल्या 48 वर्षांच्या उण्यापुर्‍या आयुष्यात समाजातील दीनदलितांच्या उद्धाराचे स्वप्न पाहिले आणि ते कृतीतून उतरविताना सत्यही करून दाखविली. शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याच्या जीवनात विविध तारखांप्रमाणे महत्वाची आहे, ती 8 ऑक्टोबर 1919 हि तारीख. या दिवशी शाहू महाराजांनी तीन जाहिरनामे प्रसिद्ध करत आपल्या संस्थानातील अस्पृश्यांच्या मुली, मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास बंदी घालत आदेश मोडणार्‍यांना कठोर शिक्षेची तरतूद केली. या आदेशांना, जाहिरनाम्यांना आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. शाहूंच्या शैक्षणिक अस्पृश्यता निर्मूलनाची शताब्दी दीनदलितांच्या विषयीची तळमळ स्पष्ट करते.

राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राजपदाच्या काळात तब्बल सव्वा लाखांहून अधिक जनाfहताचे आदेश काढल्याचे इतिहासाचे संशोधक, अभ्यासक सांगतात. चोवीस तास आपल्या रयतेची काळजी वाहणारा हा लोकराजा नेहमीच बहुजन समाजाच्या विकासाचे स्वप्न पाहत राहिला. दीनदलितांना सशक्त करण्यासाठी आग्रही राहिला. त्यातtनच्या त्यांच्या हातून बहुजन उद्धाराचे कार्य घडत गेले. त्या काळी बहुजन समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. दलित अर्थात अस्पृश्य समाजातील मुले, मुली तर शिक्षणापासून कोसो दूर होती. स्पृश्य, अस्पृश्य, शिवाशिव पाळणार्‍या त्यावेळच्या समाजात अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाहू महाराजांनी स्वतः पुढाकार घेत स्वतंत्र शाळा काढल्या होत्या. माया अस्पृश्य समाजातील रयतेची मुलेही शिकली पाहिजेत, शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजेत, असा शाहू महाराजांचा आग्रह होता. त्यानंतर पुढचे पाऊल टाकत महाराजांनी अस्पृश्यता निर्मूलनाची, निवारणाच्या मोहिम तीव्र केली. त्यातून आदेश काढण्यात आले. 8 ऑक्टोबर 1919 या दिवशी शाहू महाराजांच्या आदेशानुसार करवीर सरकारचे चिटणीस गोपाळ गंगाधर आणि सरसुभे के. गायकवाड यांनी तीन जाहिरनामे प्रसिद्ध केले.

ते तीन जाहिरनामे असे :

पहिला जाहिरनामा : मागासजातीतील महिलांना शिक्षणाची सुविधा देणारा

त्यावेळी महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांनी एक हुकूम दिला होता. मागासलेल्या जातीच्या स्त्रियांच्या शिक्षणाची कोल्हापुरात सर्व प्रकारची सोय करणार असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार तारीख 8 ऑक्टोबर 1919 रोजी काढण्यात आलेल्या जाहिरनाम्यात म्हटले होते की, छत्रपती महाराणी यांनी आज्ञा केली आहे की, मागासलेल्या लोकांत पडदा नाहि. तेंव्हा मागासजातील बायका ज्यांना विद्या शिकण्याची इच्छा असेल त्यांनी आपासाहेब मामासाहेब सुर्वे यांच्याकडे अर्ज करावेत, ते त्यांची बोर्डिंग आणि लॉजिंगची व्यवस्था करतील. स्वाक्षरी : गोपाळ गंगाधर, चिटणीस आणि के. गायकवाड, अॅड. सरसुभे.

दुसरा जाहिरनामा : अस्पृश्यांच्या मुलांना मुले इतरांच्या मुलांच्या शाळेत प्रवेश

दुसर्‍या जाहिरनाम्यात शाहू महाराजांच्या आदेशानुसार करवीर संस्थानमधील अस्पृश्य लोकांच्या मुलांसाठी असणार्‍या स्वतंत्र शाळा बंद करण्यात आल्या. तसेच अस्पृश्यांची मुले इतरांच्या मुलांसाठी असणार्‍या शाळेत शिक्षण घेतील. कोणतीहि शिवाशिव पाळता येणार नाहि. त्यांना इतर जातीच्या मुलांप्रमाणे शाळेत दाखल करून घेण्यात यावे. सरकारी शाळात शिवाशिव पाळावयाची नसल्याने सर्व जाती, धर्माच्या मुलांना एकाfत्रत बसवण्यात यावे, येणार्‍या दसर्‍यापासून याची अंमलबजवणी करावी, असे या जाहिरनाम्याच्या माध्यमातtन शाहू महाराजांनी आदेश दिले.

तिसरा जाहिरनामा : सार्वजनिक ठिकणी अस्पृश्यता न पाळण्याचा हुकूम

सार्वजनिक इमारती, धर्मशाळा, स्टेट हौसिस, सरकारी अन्नछत्रे आदी ठिकाणे, नदीचे पाणोथे, सार्वजनिक विहिरी येथ॓ मनुष्यप्राण्याचा विटाळ मानण्याचा नाही. ख्रिचन पाfब्लक बिडिगमध्ये व सार्वजनिक विहिरीवर जसे अमेरिकन मिशनमधील डॉ. व्हेल व वानलेस हे सर्वांना एकसहा समतेने वागवितात. त्याप्रमाणे येथेहि कोणाचा विटाळ न मानता वागविणेचे आहे. तसे न झाल्यास गावकामगार पाटील, तलाठी यांना जोखीमदार धरले जाईल. या प्रमाणे तजवीज व्हावी.

एकेकाळी समाजात शिवाशिव होती, हे आज खरं तर पटणार नाही. पण ते वास्तव होते. त्यावेळी अस्पृश्यांना वेगवेगळे बसविले जात असे. माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागविणे म्हणजे सामाजिक न्याय, समता होय, यावर शाहू महाराजांचा विश्वास होता. त्यांनी आपल्या करवीर संस्थानमध्ये त्याची सुरूवात आदेश, जाहिरनामे काढून केली.

डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक