|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » leadingnews » दिवाळी भेट : केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

दिवाळी भेट : केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ 

 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱयांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के घसघशीत वाढ केली आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 50 लाख कर्मचारी व 65 लाख निवृत्तीवेतन धारकांना मिळणार आहे. 1 जुलैपासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

यामुळे 16 हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार असून, चालू आर्थिक वर्षाच्या १ जुलैपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे जावडेकर म्हणाले. नव्या निर्णयामुळं केंद्रीय कर्मचाऱयांचा भत्ता 12 टक्क्यांवरून 17 टक्के झाला आहे. वाढीव भत्ता जुलै 2019 पर्यंत कर्मचाऱयांना मिळणार आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या विस्थापितांना साडेपाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही सरकारनं घेतल्याची माहितीही जावडेकर यांनी यावेळी दिली.