|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » संघाची विचारधारा समजून घेण्यासाठी कार्यक्रमाला गेलो : नितेश राणे

संघाची विचारधारा समजून घेण्यासाठी कार्यक्रमाला गेलो : नितेश राणे 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

मी आरएसएसची विचारधारा समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो. ज्या पक्षात प्रवेश केला त्यांची ध्येय-धोरणं, विचार जाणून घेतले, असे नितेश राणे यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. सध्या नितेश राणेंचा संघाच्या दसरा मेळाव्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यामुळे नेटीकऱयांनी त्यांना ट्रोल केल आहे. त्यावर राणेंनी हे स्पष्टीकरण दिले आहे. नितेश राणेंनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नितेश राणे यांनी मंगळवारी संघाच्या कार्यक्रमात स्वयंसेवकांबरोबर जमिनीवर बसून हजेरी लावल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

महाराष्ट्र विधनसभेच्या एकूण 288 जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी 8 कोटी 95 लाख 62 हजार 706 मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 95,473 मतदान केंद्रं असून 1.8 लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. हरयाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान होत आहे. हरयाणा विधनसभेची मुदत 3 नोव्हेंबरला संपत आहे.

Related posts: