|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू 

पुणे / प्रतिनिधी : 

मान्सूनचा परतीच्या प्रवासास बुधवारी सुरुवात झाली. मान्सूनने पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थानातून माघार घेतली आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. 

उत्तरपूर्व राजस्थानच्या भागात वातावरणाच्या खालच्या स्तरात सध्या हवेची द्रोणीय स्थिती असून, वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कमी, तसेच पावसाचे प्रमाण कमी अशी वैशिष्टय़े सध्या पंजाब, हरियाणा व उत्तर राजस्थानच्या भागात दिसून येत आहेत. यंदाचा मान्सून हा सर्वात विलंबाने परतणारा मान्सून ठरला आहे.

सर्वसाधारणपणे 1 सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. याआधी 1961 ला 1 ऑक्टोबरला, तर 2007 मध्ये 30 सप्टेंबरला सर्वाधिक उशिरा मान्सून माघारी फिरला होता. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून वायव्य भारत तसेच मध्य भारतातून माघारी फिरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

दरम्यान, पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

 

Related posts: