|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » राहुल गांधी 13 ऑक्टोबरला महाराष्ट्रात

राहुल गांधी 13 ऑक्टोबरला महाराष्ट्रात 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असताना काँग्रेसच्या प्रचारासाठी माजी अध्यक्ष राहुल गांधी येणार की नाही, याबाबत अनेक चर्चा रंगत होत्या. मात्र, आता राहुल गांधी 13 ऑक्टोबरला महाराष्ट्रात येणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.

या महाराष्ट्र दौऱयात राहुल गांधी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करतील. यावेळी मुंबईत काँग्रेसची सभा होण्याचीही शक्मयता आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीही याच दिवशी अर्थात 13 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौरा करणार आहेत. विदर्भातल्या जळगाव साकोली भागात मोदी आपल्या प्रचार सभा घेणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारक उतविण्यात येणार आहेत. यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी प्रतंप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा आदींचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसकडून निवडणूक आखाडय़ात रंगत येणार आहे. दरम्यान, राहुल गांधी परदेश दौऱयावर गेल्याने ते प्रचारला येणार नाही, अशी चर्चा होती.

 

Related posts: