|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » रोहितला त्याच्या फलंदाजीचा आनंद घेऊ द्या : विराट कोहली

रोहितला त्याच्या फलंदाजीचा आनंद घेऊ द्या : विराट कोहली 

पुणे / प्रतिनिधी : 

रोहितला त्याच्या फलंदाजीचा आनंद घेऊ द्या, असे मत कर्णधार विराट कोहली याने पत्रकार परिषदेत व्यक्त केले. रोहित दुसऱया सामन्यात कशा प्रकारची खेळी करेल, असे विचारले असता विराटने काही काळासाठी रोहितला एकटे सोडा. तुम्हाला माहीत आहे, तो चांगला खेळत आहे. त्याला आपल्या फलंदाजीचा आनंद घेऊ द्या. तो कसा खेळणार आहे, याकडे लक्ष देणे बंद करा, असा सल्ला त्याने दिला. कसोटी संघात अंतिम अकरा जणांमध्ये कुलदीप यादवला स्थान मिळालेले नाही आणि त्यामागचे कारण त्यालाही ठाऊक आहे, असे स्पष्ट करताना शमीने स्वतःहून जबाबदारी स्वीकारली आहे. त्याला याहून अधिक सांगण्याची गरज वाटत नाही. आता या सत्रात गोलंदाजी करायची आहे, असे त्याला सांगावे लागत नाही. संघाला आवश्यकता असते त्या वेळी तो स्वतःहून गोलंदाजीसाठी येतो. सपाट आणि निर्जीव खेळपट्टीवरही चेंडू स्विंग करण्याच्या कलेमुळे तो खास आहे. प्रतिकूल परिस्थितीतही सामना फिरवण्याची क्षमता या त्याच्याकडे आहे. दुसऱया डावात कठीण परिस्थितीतही तो आपली कामगिरी चोखपणे पार पाडतो, अशा शब्दांत त्याने शमीचे कौतुक केले.

भारतीय संघात लवचिकता

गेल्या काही वर्षांत भारतीय संघव्यवस्थापनाने कसोटी सामन्यांसाठी अनेकदा नियोजनात बदल केले आहेत. याबाबत विराटला विचारले त्यावर तुम्ही आतापर्यंतचे निकाल पाहिले असतील, तर त्याचे उत्तर तुम्हाला मिळेल. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून जे बदल करत आहोत, त्याबाबत खूप चर्चा होत असते. अधिकाधिक सामने कसे जिंकता येतील, यावर आमचा भर असतो. त्यात आम्ही यशस्वीही ठरत आहोत, याकडे लक्ष वेधत गेल्या तीन वर्षांत आम्ही खूप कमी सामन्यांमध्ये पराभूत झालो आहोत. संघात लवचिकता आहे. संघाने साथ दिली नाही, तर हे शक्मय होणार नाही, असेही त्याने सांगितले.