|Saturday, January 25, 2020
You are here: Home » leadingnews » पावसाने राज‘गर्जने’ला खो

पावसाने राज‘गर्जने’ला खो 

पुणे / प्रतिनिधी : 

सोसाटय़ाच्या वाऱयासह झालेल्या पावसाने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा गुरुवारी रद्द करावी लागली. त्यामुळे ‘राज गर्जेने’ला खो बसला.

राज ठाकरे या सभेच्या माध्यमातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार होते. नातूबागेतील सरस्वती विद्या मंदिराच्या प्रांगणात राज ठाकरे यांची ही सभा होणार होती. विजयादशमीच्या दिवशी झालेल्या पावसामुळे येथे चिखलाचे साम्राज्य झाले होते.

मात्र, मनसैनिकांनी मोठय़ा कष्टाने त्याच्यावर मात करीत सभेची तयारी सुरू केली होती. परंतु, सायंकाळी 6.15 च्या सुमारास पुण्यात वादळी वाऱयासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे मैदानावर पुन्हा पाणीच पाणी झाले. त्यामुळे सर्व कार्यकर्तेही सभास्थळापर्यंत पोहोचू शकले नव्हते. जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने कार्यकर्त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन संरक्षण केल्याचे चित्रही पहायला मिळाले.

राज यांच्या भूमिकेकडे लक्ष

ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे प्रथमच सभा घेत होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले होते. पण, पावसामुळे मनसैनिकांचा रसभंग झाला.

 

 

 

 

Related posts: