|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » विविधा » जैवविविधतेचा वारसा सांगणाऱया प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन

जैवविविधतेचा वारसा सांगणाऱया प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन 

पुणे /  प्रतिनिधी : 

पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे, आयसर, पुणे व महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाद्वारे समर्थित महाराष्ट्र जनुक कोश (मजको) तर्फे पुण्यात जैवविविधता आणि महाराष्ट्राचा जैवसांस्कृतिक वारसा याबद्दल संवाद साधणारे फोटोग्राफी-प्रदर्शनाचे गुरुवारपासून पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.

आयसर येथे भरणाऱया या प्रदर्शनात आदिवासी, भटके समुदाय, मासेमार, शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी अशा विविध पार्श्वभूमी असणाऱया व्यक्तींनी त्याच्या नजरेतून जीवन आणि संस्कृती मांडणारे फोटो काढले आहेत. यामध्ये 23 च्यावर फोटोग्राफर्सनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे. गुरुवारी (उद्या) सायंकाळी चार वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, 13 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

सध्या जंगल, कुरणं, नद्या, समुद्र, वातावरण अशा सार्वजनिक संसाधनांचा नाश होतोय आणि लोकं हताशपणे पाहताहेत. हवामान बदल, जंगल-नद्या तळय़ांचा नाश हा सर्वसामान्यांबरोबरच शेतकरी, आदिवासी, भटके, भोई-ढिवर यांच्या जवळचा विषय आहे. मात्र, या लोकांना मुख्य प्रवाहात स्थान दिले जात नाही. यासाठी केवळ संघर्ष हे केवळ माध्यम न ठरता संवाद साधण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे सर्व बाजूना संवादासाठी ‘लग्न’ खास थीम यासाठी वापरण्यात आली आहे. जाती, धर्म, वर्गाच्या, शहरी-ग्रामीण भेदाच्या पलीकडे जाऊन या जैवविविधतेशी संबंधित मुद्यांकडे बघण्याची वेगळी दृष्टी विकसित करता येईल. यासाठी सीईई वर्षभरापासून तयारी करीत आहेत. या वर्षभराच्या प्रक्रियेत युवराज शिंगटे, बसवंत ढुमणे आणि सविता भारती यांची मोलाची मदत केली.