|Friday, October 18, 2019
You are here: Home » उद्योग » सिंगापूरची व्हर्च्युअल रिटेल रेमण्डची जमीन खरेदी करणार

सिंगापूरची व्हर्च्युअल रिटेल रेमण्डची जमीन खरेदी करणार 

700 कोटी रुपयामध्ये 20 एकर जमीन घेणार

वृत्तसंस्था/ मुंबई

सिंगापूरची कंपनी व्हर्च्युअल रिटेल दक्षिण आशियाने रेमण्ड कंपनीची मुंबईत 20 एकर जमीन 700 कोटी रुपयाना खरेदी केली आहे. या जागेवर लवकरच कंपनी रिटेल प्रकल्प विकसित करणार असून त्यासाठी 1,700 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे. अशी माहिती कंपनीने बुधवारी दिली आहे.

रेमण्ड सोबत व्हर्च्युअल व्यवहार करण्यात आल्यानंतर यातील 37 लाख स्वेअर फूटावर कंपनी लहान केंद्र उभारणार आहे. यातील 24 लाख स्केअर फूटावर कंपनी व्हीआर रिटेल मॉलची बांधणी करणार आहे. मेट्रो शहरात सध्या इतक्या मोठय़ा जमीनीचे व्यवहार होत नसल्याचे व्हर्च्युअलचे अध्यक्ष सिद योग यांनी सांगितले आहे.

विस्तार

व्हर्च्युअल रिटेल दक्षिण बेंगळूर आणि दिल्लीत मॉलची उभारणी करत आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत नवीन मॉल सुरु होणार आहेत. तर वर्ल्ड क्लास प्रकल्पाना ग्राहकांची मागणी वाढत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित जॉर्ज यांनी यावेळी दिली आहे.