|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सरकार लिथियम आर्यन बॅटरीच्या पुनर्वापराची योजना

सरकार लिथियम आर्यन बॅटरीच्या पुनर्वापराची योजना 

इलेक्ट्रिक वाहनांसाठी करण्यात येणार वापर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरण्यात येणाऱया लिथियम आर्यन बॅटऱयांचा पुनर्वापर करण्यासाठीची योजना लवकरच आणणार आहे. सरकार एक्सटेंडेड प्रोडय़ूसर रिन्पॉन्सिबिलिटी (इपीआर) च्या आधारे बॅटरी तयार करणाऱया कंपन्यांसाठी वापर करण्यात आलेल्या (बॅटरीचा काम करण्याचा कालावधी समाप्त) ना एकत्रित करणे, आणि त्याचा पुनर्वापर  करण्यासाठीचा नवीन नियम सरकार लवकरच येत्या काळात लागू करणार आहे. या बॅटरीची विक्री करताना संबंधीत निर्मिती करणाऱया कंपनीला कर सवलत देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

योजनेचा प्रस्ताव

एकदा वापर केलेल्या बॅटरीचा पुनर्वापर  करण्यासाठी कंपनीला पुनउ&त्पादन करण्याची सर्व सुविधा देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी जुन्या बॅटरीचा साठा करण्यात येणार आहे. त्या ठिकाणीच पुनउ&त्पादन प्रक्रिया ठेवण्यात येणार आहे. पर्यावरण, जंगल आणि पाणी-हवा मंत्रालय यासाठीचा आवश्यक असणारा प्रस्ताव  मंत्रिमंडळाकडे पाठवून देणार आहे.  

इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत घट

भारतात बॅटरीचा वापरात लिथियम, कोबाल्ट, निकिल आणि ऍल्युमिनिअय या घटकांची सर्वाधिक आयात करावी लागते. यामध्ये सरकार वापर केलेल्या बॅटरीचा उपयोग करुन दुसऱयादा(पुनर्वापर) उपयोगात आणण्याची योजना तयार करत आहे. यामुळे याचा थेट परिणाम इलेक्ट्रिक वाहनांवर पडणार आहे. याकरीता सरकार इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन योजनेला 2020 पर्यंत चालना देणार आहे.