|Friday, October 18, 2019
You are here: Home » उद्योग » लवकरच देशभरात वाहन नंबर पोर्टिबिलिटीची योजना

लवकरच देशभरात वाहन नंबर पोर्टिबिलिटीची योजना 

मनपसंद नंबर घेता येणार स्वस्तमध्ये

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशभरात आगामी काळत वाहनांचे नंबर पोर्टिबिलिटी करण्याची योजना लागू करण्यात येणार आहे. दिल्ली नंतर उत्तर प्रदेशमधील नोएडा या ठिकाणी ही सेवा कार्यरत करण्यात आली आहे. यामध्ये जुना नंबरला नवीन वाहनांसाठी खरेदी करता येणार आहे. चार चाकी वाहनधारकांना या सुविधांसाठी 50 हजार रुपये आणि दोन चाकी वाहनांना 20 हजारपर्यंत खर्च करावे लागणार आहे.

व्हीव्हीआयपी नंबर घेण्यासाठी लिलाव लावण्यात येणार आहे. त्यासाठी त्यात सहभाग घेणे आवश्यक आहे. यामध्ये वाहनधारकांना एक लाख रुपये कमी भरावे लागतील, तर अन्य कोणी किती रुपये बोली लावणार त्यावर संबंधीताना फॅन्सी नंबर उपलब्ध होणार आहेत.