|Thursday, February 27, 2020
You are here: Home » उद्योग » सॅमसंगचे 2020 पर्यंत उत्पादन दुप्पट करण्याचे ध्येय

सॅमसंगचे 2020 पर्यंत उत्पादन दुप्पट करण्याचे ध्येय 

भारतात उत्पादन वाढीवर भर : सॅमसंगचे उपाध्यक्ष ली जे-यॉन्ग भारत दौऱयावर  

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सॅमसंगचे उपाध्यक्ष ली जे-यॉन्ग सध्या भारत दौऱयावर आहेत. त्यामुळे ते सध्याचे सणासुदीचे दिवस व नवीन व्यापार विषयक धोरणाचा विस्तार करणे,नवीन गुंतवणूक वाढविणे आणि ग्राहकांची आवड लक्षात घेऊन भारतीय व्यापारात वाढ करण्यावर भर देणार असल्याची माहिती कोरियामधील प्रसार माध्यमानी त्यांच्या भारत दौऱयासंदर्भात स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.  रविवारी यॉन्ग हे भारतात दाखल झाले आहेत. त्यांनी संबंधीत अधिकाऱयांसोबत मोबाईल व्यवसायासंबंधी चर्चा केली आहे. सॅमसंगला टक्कर देणाऱया कंपन्यांमध्ये वीवो आणि ओप्पो यांनी भारतात मोठी गुंतवणूक करण्यासाठीची घोषणा केली आहे. तर सरकारने गुंतवणूक आणि व्यापार वाढीसाठी मागील महिन्यात नवीन उत्पादन संस्थासाठी कॉर्पोरेट कर कपातीची घोषणा केली आहे.

2020 पर्यंतचे उत्पादन

सॅमसंग देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओला आपले उत्पादन पाठवत असते. त्यामध्ये जिओ 5 नेटवर्क योजना जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सॅमसंग भारतामधील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये सॅमसंग मोठे उत्पादन घेत आहे. 2020 पर्यंत हाच उत्पादनाचा आकडा दुप्पट करण्याचे ध्येय असल्याचे सॅमसंगने नमूद केले आहे. 

  सणासुदीत 20 लाख मोबाईलची विक्री

सॅमसंगकडून सणासुदीच्या दिवसात जवळपास 20 लाख मोबाईलची ऑनलाईन विक्री करण्यात आली आहे. यात 3,000 कोटी रुपयाच्या व्यापाराची उलाढाल झाल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. मागील जुलैपर्यंत कंपनीने 2020 पर्यंत मोबाईल हॅण्डसेन्ट 12 कोटी युनिट करण्याचे ध्येय कंपनीने निश्चित केले होते.

Related posts: