|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » संघर्ष कराल, तरच आयुष्यात यशस्वी व्हाल!

संघर्ष कराल, तरच आयुष्यात यशस्वी व्हाल! 

पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांचे प्रतिपादन

वार्ताहर / कट्टा:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ हा मूलमंत्र दिला आहे. बौद्ध समाजातील तरुणांनी त्यांच्याकडे असलेल्या क्षमतेचा योग्य वापर करायला हवा. संघर्ष केला, तर आयुष्यात यशस्वी होता येते. आपल्याकडे गुणवत्ता असेल, तर नोकरीची संधी मिळते. त्यासाठी जीवनात शिक्षणाला महत्व असून शिक्षणाने जग जिंकता येते. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म धम्म बांधवांनी आत्मसात करायला हवा, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केले.

 कट्टा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुका शाखेतर्फे 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी गेडाम बोलत होते. डॉ. प्रियांका गेडाम, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, दयानंद मेथर, व्ही. टी. जंगम, दर्शना गुळवे, रविकांत कदम, संजय पेंडूरकर, गौतम पळसंबकर, आनंद धामापूरकर, शशी गोठणकर, नरेंद्र पेंडूरकर, विलास वळंजू, शिवप्रसाद चौकेकर, संदीप धामापूरकर, नंदू हेदुळकर आदी उपस्थित होते. समाजातील विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या डॉ. अनुप पळसंबकर व डॉ. अक्षय पळसंबकर, डॉ. दिलीप कदम, डॉ. जागृती कदम, प्रा. नंदू हेदुळकर, वैभव वळंजू, निखील वराडकर, आयुष वराडकर, संदेश डिकवलकर यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. समता सैनिकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

 गेडाम यांनी जिल्हय़ातील आंबेडकरवादी चळवळीचे कौतुक केले. आपल्या समाजाला बळकटी देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आंबेडकरवादी चळवळीत खंड पडू देऊ नका, असे आवाहन केले. आपल्या समाजातील युवा पिढी सर्व क्षेत्रात नावलौकिक मिळवित आहे. त्यामुळे भविष्यात सर्वार्थाने श्रीमंत पिढी घडविण्यासाठी व तरुण पिढीला प्रशासकीय सेवांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार असल्याचे विश्वनाथ कदम यांनी सांगितले. बौद्ध धम्माचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे, असे कौडिण्य पवार म्हणाले. अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. दयानंद मेथर म्हणाले, आपले शब्द ही शस्त्रs बनली पाहिजेत. जेव्हा कोणाला बाराखडी, शाळा माहिती नव्हती, तेव्हा गौतम बुद्धांनी पाच विश्वविद्यालये दिली. शिक्षण झालेल्या माणसाने जागृत होणे आवश्यक असते. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या शुद्ध विचारांच्या जोरावर नव्याने समाज उभा राहिला पाहिजे. महामानवांच्या विचारधारेची घागर सर्वांनी डोक्मयावर घेऊन चळवळीला पाणी देऊन ती पुनरुज्जीवित करायला हवी. त्यातूनच खऱया अर्थाने महामानवांचे विचार समाजापर्यंत पोहोचतील. सूत्रसंचालन सचिव सूर्यकांत कदम, प्रास्ताविक प्रकाश पवार, तर आभार पळसंबकर यांनी मानले.