|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » उद्योग » सलगच्या घसरणीनंतर बाजारात मोठी उसळी

सलगच्या घसरणीनंतर बाजारात मोठी उसळी 

सेन्सेक्स 664 अंकानी वधारला : निफ्टी

वृत्तसंस्था/ मुंबई

आठवडय़ातील दुसऱया सत्रात मुंबई शेअर बाजारात (बीएसई) मागील सहा सत्रात राहिलेल्या घसरणीला अखेर बुधवारी पूर्णविराम मिळाला आहे. कंपन्यांचे तिमाही नफा कमाईचे आकडे येत्या काही दिवसातच सादर हेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाजारत बँका व आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधार झाली आहे.

दिवसभरात बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 645.97 अंकानी वधारुन निर्देशांक 38,177.95 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 186.90 अंकानी तेजी नोंदवत 11,313.30 वर बंद झाला आहे.

बुधवारी बाजार विजया दशमी दसऱयाच्या सुट्टीच्या विश्रांतीनंतर सुरु झाला होता. बाजारात दुपारनंतर समभागांचा मोठय़ा प्रमाणात लिलाव झाल्याचे पहावयास मिळाले त्यामुळे बाजारला मोठी झेप घेणे शक्य झाले. यामध्ये बँकिंग, फायनान्स आणि दूरसंचार क्षेत्रातील समभागांचा मोठा सहभाग राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.  

दिग्गज कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक 5.45 टक्क्यांनी सर्वाधिक फायद्यात राहिली आहे. भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, कोटक बँक, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग वधारले आहेत. तर येस बँक 5.26 टक्क्यांनी नुकसानीत राहिली आहे. हीरोमोटोकॉर्प, एचसीएल टेक, आयटीसी, टीसीएस, इन्फोसिस, ओएनजीसी आणि बजाज ऑटो यांचे समभाग मात्र 2.65 टक्क्यांनी घसरले आहेत.

महत्वाच्या क्षेत्रांची झेप

बीएसईमध्ये दूरसंचार क्षेत्र 4.92, बँकिंग 3.67, फायनान्स 2.84, धातू निर्मिती 2.12, रिअटी 1.99 बेसिक मटेरिअल्स 1.95 आणि ऊर्जा 0.98 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. आयटी, कझ्युमर डय़ूरेबल्स आणि टेक यांची कामगिरी मात्र 0.92 टक्क्यांनी नुकसानीत राहिली आहे.