|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बांद्यात तीन संशयास्पद महिलांचा वावर

बांद्यात तीन संशयास्पद महिलांचा वावर 

प्रतिनिधी / बांदा:

बांदा शहरातील इंग्रजी माध्यम शाळेजवळ बुधवारी तीन महिला संशयास्पदरित्या फिरत होत्या. शाळेतील शिक्षक व पालकांनी विचारणा केली असता त्यांनी तेथून पलायन केले. गेल्या आठ दिवसात तीनवेळा या महिला शाळेच्या स्वच्छतागृहाकडे फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले होते. आजही तोच प्रकार झाल्याने पालक व शिक्षकांनी या महिलांना जाब विचारला. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तेथून पलायन केले. त्यांचे चेहेरे झाकलेले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.

याबाबत शाळा व्यवस्थापनाने खबरदारी घेण्याची मागणी पालकांनी केली आहे. तसेच संशयित महिला पुन्हा या परिसरात आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.