|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिरशिंगेत विजेचा लोळ घरात शिरला

शिरशिंगेत विजेचा लोळ घरात शिरला 

वार्ताहर / सावंतवाडी:

विजेच्या कडकडाटासह गेले दोन दिवस सावंतवाडी तालुक्यात सहय़ाद्री पट्टय़ात पाऊस पडत आहे. शिरशिंगे-देऊळवाडी येथील महादेव बाबाजी राऊळ यांच्या घरात विजेचा लोळ शिरल्याने घराच्या भिंतीला भेग पडली. विजेचा लोळ घरात घुसला, तेव्हा पाच माणसे घरात होती. सुदैवाने ती बचावली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

सांगेली भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. शिरशिंगे-देऊळवाडीत महादेव बाबाजी राऊळ यांच्या घरात विजेचा लोळ घुसला अन् घरातील टी. व्ही., मिक्सर, वीज मीटर जळून खाक झाला. घरातील खोलीच्या भिंतीला भेग पडली. विजेचा लोळ घुसला तेव्हा घरातील व्हरांडय़ात महादेव राऊळ व खोलीत त्यांची पत्नी सुवर्णा राऊळ, मुलगी प्रणाली राऊळ, वहिनी गोपिका राऊळ यांना धक्का बसला. हे पाचहीजण किरकोळ जखमी झाले. याबाबत तलाठी यांनी पंचनामा केला. माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत यांनी भेट दिली. या भागात भातपीक कापण्याजोगे झाले आहे. सततच्या पावसामुळे विजेच्या कडकडाटासह पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

11 ऑक्टोबरपर्यंत विजेसह वादळी वारे

भारतीय हवामान विभाग मुंबईकडून 9 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हय़ात विजेच्या गडगडाटासह तुरळक पाऊस पडणार आहे. सावधानता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.