|Friday, October 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दूतावासांद्वारे पाक पाठवतोय बनावट नोटा

दूतावासांद्वारे पाक पाठवतोय बनावट नोटा 

दहशतवादी कारवायांसाठी वापर : गुप्तचर यंत्रणेचा खुलासा

वृत्तसंस्था/ लंडन

 नोटाबंदीच्या जवळपास 3 वर्षांनी पाकिस्तान पुन्हा बनावट नोटांच्या मदतीने भारताला अस्थिर करू पाहत आहे. पाकिस्तान उत्तम प्रतीच्या बनावट नोटांची मोठय़ा प्रमाणात तस्करी करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. बनावट नोटांच्या मदतीने लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटना भारतात हल्ले घडवून आणू पाहत आहेत. भारतात बनावट नोटा पाठविण्यासाठी पाकिस्तानने नेपाळ, बांगालदेश समवेत अन्य देशामंधील स्वतःच्या राजयनिक मार्गांचा वापर चालविला आहे.

भारतात बनावट नोटा पाठविण्यासाठी पाकच्या अनेक गुन्हेगारी टोळय़ा कार्यरत आहेत. बनावट नोटांची गुणवत्ता चांगली रहावी यासाठी आयएसआय प्रयत्नशील असल्याचे समजते. दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंधित गुन्हेगार युनुस अंसारीला मे महिन्यात 3 पाकिस्तानी नागरिकांसह अटक करण्यात आली होती. अंसारीला बनावट नोटा पाकिस्तानचा तस्कर रज्जाक मरफानीने पुरविल्या होत्या.

काठमांडू ठरले केंद्र

आयएसआयने भारतात बनावट नोटा पाठविण्यासाठी काठमांडूतील दूतावासालाच केंद्र केले आहे. तसेच नेपाळच्या बीरगंजला ट्रान्झिट पॉइंट म्हणून वापरले जातेय. आयएसआय पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सद्वारे दुबई, क्वालांलपूर, हाँगकाँग आणि दोहामधील स्वतःच्या मुत्सद्यांच्या बॅगेतून बनावट नोटा पाठवत आहे. या ठिकाणांवरून बनावट नोटांची घेप कुरियरद्वारे काठमांडू येथे पाठविली जाते.